आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात उपाययोजना ठरताहेत फार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जुन्यानाशकात घंटागाडी अनियमित येत असल्याने वैतागलेले नागरिक रस्ता किंवा जागा मिळेल तेथे कचरा टाकत आहेत. स्वच्छता मोहीमही फार्स ठरत असल्यामुळे डासांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. जुन्या नाशकात आतापर्यंत डेंग्यूने तीन बालकांचा मृत्यूही झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात डासांचे औषध धूर फवारणी केली जात नसल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. परिसरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळेच डासांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या कच-यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी साचलेल्या पाण्यावर डासांची उत्पत्ती होते.
कथडाभागात रस्त्यावर कचरा कथडाभागातील डॉ. आंबेडकर उद्यानासमोर कचरा साचलेला असतो. हाकेच्या अंतरावर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आहे. रुग्णालयात येणा-यां रुग्णांना या कचराकुंडीतूनच जावे लागते. खडकाळी सिग्नलजवळ ‘स्पॉट’ खडकाळीसिग्नलजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. या ठिकाणी घंटागाडी कर्मचारी वरच्यावर कचरा उचलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जिन मंझीलजवळही अशीच परिस्थिती आहे.
प्रशासनाने लक्ष द्यावे
आमच्याभागात घंटागाडी दररोज येत नाही. त्यामुळे कचरा दोन-दोन दिवस घरातच साठवून ठेवावा लागतो. अनेकजण रस्त्यावरच कचरा टाकत असल्यामुळे दररोज वेळेवर यावी, अशी अपेक्षा आहे. -वंदना कदम,रहिवासी स्वच्छता मोहिमेनंतरही झाकीर हुसेन रुग्णालय परिसरात साचलेले पाण्याचे डबके. दुसऱ्या छायाचित्रात गच्चीवर अनेक दिवसांपासून साचलेले पाणी.