आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हजार अतिक्रमणे हटणार, महापालिका प्रशासनाची उद्यापासून कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेच्या नगररचना अतिक्रमण विभागाने शहरातील दाेन हजार अतिक्रमणे निश्चित केली असून, पालिकेने लाल रंगाने सीमांकन केल्यानंतर ८० टक्के अतिक्रमणे लाेकांनी स्वयंस्फूर्तीनेच काढून घेतली अाहेत. उर्वरित अतिक्रमणांवर साेमवार (दि१९)पासून हाताेडा फिरवला जाणार असून, त्यासाठी अतिक्रमण विभाग सज्ज झाला अाहे.

शनिवारी (िद. १७) महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी अतिक्रमण विभागाने केलेल्या सीमांकनाचा अाढावा घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी शहरातील दाेन हजार स्थळांवर सीमांकन केल्याची माहिती त्यांनी िदली. सीमांकनानंतर काही लाेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतल्याचे सांगण्यात अाले. दरम्यान, अतिक्रमण निर्मूलन माेहिमेसाठी सद्यस्थितीत १६ पाेलिस कर्मचाऱ्यांचे पथक असून, ते पुरेसे नसल्यामुळे वाढीव पाेलिस कर्मचाऱ्यांची मागणीही करण्याचा प्रस्ताव अायुक्तांसमाेर ठेवण्यात अाला. त्याबाबत पाेलिस अायुक्तालयाकडे मागणी नाेंदवण्याचे अादेशही त्यांनी िदल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.
‘फॅनिंग पॉंइंट’चे अतिक्रमण हटेल का?
शहरातीलप्रमुख चाैकांत ‘फॅनिंग पाॅइंट’ची (काॅर्नर प्लेस) जागा साेडताना अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवले असून, त्याबाबत अायुक्त काय भूमिका घेणार, असा सवाल विराेधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत केला. अशी जागा साेडणाऱ्या जागामालकांवर नगररचना विभागाने का कारवाई केली नाही, असा प्रश्न उपस्थित करतानाच त्याकडे डाेळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, याचे उत्तर नाशिककरांसाठी महत्त्वाचे असेल, असे त्यांनी सांगितले.