आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनशील भागांवर अाता ‘हाताेडा’, पाेलिस बंदाेबस्त नसल्याने प्रशासनाचे अास्ते कदम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील प्रमुख संवेदनशील चाैकातील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका प्रशासनाने कृती अाराखडा तयार केला असून, तूर्तास येथे माेठ्या संख्येने पाेलिस बंदाेबस्ताची गरज असल्यामुळे प्रशासनाने सध्या याबाबत अास्ते कदम धाेरण स्वीकारले अाहे. नाशिकराेड येथील अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक झाल्यानंतर पाेलिस बळाची गरज असल्याचा सूर प्रशासनाकडून व्यक्त हाेत अाहे.
सिंंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्ते चाैकातील अतिक्रमणे काढून घेण्यासाठी पालिकेने जानेवारीपासून विशेष माेहीम उघडली, मात्र त्यानंतर लाेकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुढाकार घेतल्यावर १२ ते १७ जानेवारीदरम्यान माेहीम थांबवण्यात अाली. अतिक्रमणे काढून घेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून नकाशाप्रमाणे रस्ता ते घर यातील सामासिक अंतर समजण्यासाठी रेखांकन करून देण्यात अाले. दरम्यान, शहरातील काही प्रमुख भागांतील अतिक्रमणे अद्यापही कायम असल्यामुळे पालिकेने त्यावर ‘हाताेडा’ फिरवण्याची तयारी केली अाहे. मात्र, यातील काही चाैकात माेहिमेला विराेध हाेण्याची शक्यता अाहे. सद्यस्थितीत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे असलेल्या पंधरा पाेलिसांच्या भरवश्यावर ही माेहीम अशक्य असल्याचे मत अधिकारी व्यक्त करीत अाहेत. या विभागाने १९ जानेवारीला पत्र पाठवून पाेलिस बंदाेबस्त मागवला अाहे. मात्र, दहा िदवस उलटूनही पाेलिस अायुक्तालयाकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.
पूर्वमध्येफक्त मार्किंग : पूर्वविभागात अनेक भागात पालिकेतर्फे फक्त ‘मार्किंग’व्यतिरिक्त कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

जेलराेडवरील नावंदर सदनातील कांकरिया मेडिकल दुकानावर सहायक अायुक्तांनी मेहेरबानी केल्याचा अाराेप व्यापाऱ्यांनी केला.

जेलराेडवरील नावंदर सदनातील फलक पीठ गिरणीचे अतिक्रमण ताेडले. मात्र, इमारतीतील कांकरिया मेडिकल दुकानावर कारवाई केली नाही. इतर व्यापाऱ्यांप्रमाणे मेडिकलधारकाने रस्त्यासाठी जागा दिली नाही, न्यायालयाची स्थगिती नसताना सहायक अायुक्त वाडेकर यांनी मेडिकलला तीन महिने मुदत दिली. यात अार्थिक देवाण-घेवाणीचा संशय व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. न्यायालयाची स्थगिती नसल्याची कागदपत्रे वाडेकरांना दिली. तरीही त्यांनी मेडिकलच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदन व्यापाऱ्यांनी अतिक्रमण उपायुक्त बहिरम, उपमहापाैर गुरुमित बग्गा यांना दिले.