आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration, Latest New In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुंभमेळ्याच्‍या मार्ग शाही; दुर्लक्षित राही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सन 2003च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सरदार चौकात चेंगराचेंगरी झाल्यानंतर 33 भाविकांचा मृत्यू झाला होता. अशीच घटना गेल्यावर्षी अलाहाबाद येथे झालेल्या कुंभमेळ्यातही घडली. तिथेही 36 भाविकांचा रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. नाशिकच्या या घटनेला अकरा वर्षे उलटली तरीही आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनातर्फे शाही मार्गाबाबत अद्याप कोणत्याही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. 27 सप्टेंबर 2003 रोजी घडलेल्या घटनेनंतर अशा घटना रोखण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करावी, असा सूर होताच. परंतु, नंतर त्याचा विसर पडला. यापूर्वीच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव पदरात असल्याने त्यावेळी असलेल्या त्रुटी दूर करण्याची गरज असताना त्याविषयी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पुढच्या वर्षी होणार्‍या नियोजन सुरू आहे. मात्र, त्यात चेंगराचेंगरीसारखी घटना घडू नये यासाठी फारसा विचारच होत नसल्याचे दिसते. घटना घडून अकरा वर्षे उलटली तरीही अद्याप सरदार चौकाचे रुंदीकरण झालेले नाही. सरदार चौकसह शाही मार्गावरील सुमारे अडीचशे ते तीनशे मिळकती तोडाव्या लागणार असल्याचे प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आले होते. मात्र, पंचवटी परिसरातील नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनामुळे ते प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.
परंतु, किमान ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे तरी रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, विरोध झाला म्हणून चेंगराचेंगरीच्या घटनेकडे प्रशासनाने जणू दुर्लक्षच केले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. तसेच महापालिकेत कोट्यवधी रुपये खर्च करून आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे. मात्र, या कक्षात प्रमुख अधिकारीच नसल्यामुळे हा विभाग सध्या वार्‍यावर आहे. सिंहस्थापूर्वीच या विभागात अधिकार्‍यांची नेमणूक करणे गरजेचे आहे.

नियोजन केवळ कागदावरच- संभाव्य चेंगराचेंगरीची घटना, भूकंप, पूर आणि दहशतवादी हल्ले या बाबी समोर ठेवून महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाने स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. या घटना घडल्या तर काय उपाययोजना करता येईल याचाही त्यात विचार केला जाणार आहे. तसेच शहरातील प्रमुख धोकादायक स्थळेदेखील त्यात नमूद करण्यात आलेली आहेत. परंतु, हे आराखडा कधी मंजुरीसाठी जाणार याची शंकाच आहे.
आरक्षित जागेवर अतिक्रमणे- गेल्या सिंहस्थात आखाड्यांसाठी जागा आरक्षित करण्यात आली होती. त्या जागेचे काही भाग करण्यात आले होते. त्यातील सेक्टर तीन व चारमध्ये मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्याठिकाणी झोपडपट्टय़ा वाढल्या आहेत. या अतिक्रमणांमुळे भाविकांना रहदारीसाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.