आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Municipal Administration Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योजकांवर टांगती तलवार कारवाईची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सातपूर औद्योगिक वसाहतीतील जवळपास २३० उद्योजकांकडून तिप्पट घरपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेने कारवाई सुरू केली असून, अधिकृत बांधकामाचे पुरावे सादर न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणर आहे. पालिकेकडून जरी कारवाई करण्यात येणार असली तरी अनेक उद्योजकांनी बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यांकरिता ह्यएमआयडीसीह्णकडे अर्ज केलेले असून, त्यांना हे दाखले अद्यापही मिळालेले नाहीत. म्हणूनच ही कारवाई थांबविण्यात यावी, यासाठी लवकरच उद्योजक संघटना महापौरांची भेट घेणार असून, कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याआधी ज्या उद्योजकांना नोटिसा आल्या असतील, त्यांनी बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यांकरिता एमआयडीसीह्णकडे सादर केलेल्या अर्जांचे पुरावे पालिकेत सादर करावेत किंवा निमाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तीन महिन्यांपूर्वी घरपट्टी विभागाने सातपूर परिसरातील काही कंपन्यांची तपासणी करून बांधकामाच्या अनुषंगाने घरपट्टी व्यवहार्य आहे का, याची चाचपणी केली. त्यात २४० उद्योजकांच्या बांधकामात तफावत आढळल्याने संबंधितांना पालिकेने नोटीस बजावल्यावर उद्योजकांनी इन्कार करीत बांधकाम अधिकृत असल्याचा दावा केला होता. दरम्यान, तत्कालीन आयुक्त संजीवकुमार यांनी उद्योजकांचे म्हणणे जाणून घेत सन्मान्य तोडगा काढला होता. त्यात ठरलेल्या मुदतीत पुरावे सादर न करणा-यांवर या प्रकारच्या कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
संयुक्त मोजणी झाली का?
आयुक्तांनी आदेश केल्याप्रमाणे या उद्योगांतील बांधकामांची मोजणी उद्योजक आणि महापालिका कर्मचारी यांच्याकडून संयुक्तरीत्या करण्यात येणार होती. पण, अशी मोजणी झाली का? हा संशोधनाचा विषय आहे. महापौरांची भेट घेऊन या बाबी लक्षात आणून देणार आहोत.
मनीष कोठारी, माजी अध्यक्ष,निमा