आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,Latest New In Divya Marathi

प्रशासनाने रोखावी पाणी गळती; नागरिकांनी करावी बचत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे आदेश दिले असून त्याला नागरिकांच्या प्रतिसादाची जोड मिळाली तर पाणीबचतीचे उद्दिष्ट सफल होईल व वाचलेले पाणी नाशिककरांसह तहानलेल्या जिल्हावासियांनाही उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन महापौर यतिन वाघ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केले.
प्रशासनाने हे करावे :
धरणाच्या साठय़ातून होणार्‍या पाणीगळतीपासून मोठय़ा जलवाहिनीद्वारे महानगराला जाणार्‍या पाण्याचा अपव्यय रोखण्याबाबत प्रशासनाने दक्ष राहण्याची गरज आहे. त्याशिवाय, शहरातील सार्वजनिक नळांना तोट्या बसविणे, घरांपर्यंत पोहोचणार्‍या जलवाहिनीची गळती पूर्णपणे बंद करण्यावर महापालिका प्रशासनाने नजर ठेवणे अत्यावश्यक आहे. अल्प पाणीगळतीही त्वरित दखल घेऊन ती रोखणे आवश्यक आहे.
नागरिकांनी हे करावे :
शिळे म्हणून फेकून देण्यात येणार्‍या पाण्याचा अपव्यय टाळावा. घरोघरी नळ-जोडण्यांतून होणारी गळती रोखल्यास मोठय़ा प्रमाणात पाणीबचत शक्य आहे. सोसायट्यांमध्ये असलेल्या भूमिगत टाक्यांमधील अंतर्गत गळती रोखल्यास दररोज लक्षावधी लिटर पाण्याची बचत होऊ शकते. पाणी ही अमूल्य संपत्ती असल्याचे जाणून त्याचा उपयोग केला तर निम्म्याहून अधिक पाण्याची बचत होऊ शकते.