आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Administration,latest News In Divya Marathi

उद्यानांतील बाकड्यांवरून सत्ताधा-यांत सामना, नगरसेवकांच्या शंभर फायली पडून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील उद्यानांची स्थिती वादात असताना आता येथील बाकडे पुरवठ्यावरून सत्ताधारी मनसे राष्ट्रवादीत जोरदार धुसफूस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महिनाभरापूर्वी महापौरपदासाठी मदत घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बाकडे मागणीच्या फायली रोखल्या जात असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे मनसे नगरसेवकांच्या प्रभागात हेच बाकडे आमदार निधीतून वाटप होत असल्यामुळे या मुद्यावरून राष्ट्रवादी उद्यान विभागाला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपला शह देण्यासाठी मनसेने राष्ट्रवादीची मदत घेतली. त्यानंतर नवीन युतीची चर्चाही रंगली हाेती. महापालिकेत सत्तेत बसणार नाही, असे राष्ट्रवादीने जाहीर करून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला हाेता. त्यामुळे सत्ताधारी विराेधक हातात हात घालून काम करतील, अशीही चर्चा हाेती. प्रत्यक्षात िनवडणुकीला जेमतेम वीस दिवस हाेत नाहीत ताेच राष्ट्रवादीला उद्यान विभागाच्या बाकडे पुरवठ्यावरून धक्का बसला अाहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वैयक्तिक निधीतून दोन लाख रुपयांच्या बाकडे पुरवठ्याची मागणी केली अाहे. मात्र, उद्यान विभागाकडून निधीचा खडखडाट, तसेच अायुक्त नसल्याचे कारण देत बाकडे पुरविण्यास नकार िदला जात अाहे.
दुसरीकडे आमदार निधीतून पंचवटी, तसेच सिडको भागात मात्र मनसे नगरसेवकांच्या प्रभागांत बाकडे पुरवठा सुरू असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीने घेतला अाहे. एकीकडे पालिकेच्या नगरसेवकांना पुरवठा होत नसताना, दुसरीकडे मनसेच्या एका अामदाराला ५० लाख रुपयांच्या निधीतून उद्यान विभागामार्फत बाकडे पुरवल्याचा मुद्दाही गाजण्याची चिन्हे आहेत. मात्र, प्रशासनाने एका अामदाराच्या दाेन ते तीन फायलीच िनकाली काढल्याचे खासगीत सांगत त्यांचेही प्रस्ताव प्रलंबित असल्याचा दावा केला अाहे.

‘उद्यान’कडे फायली नाहीत
उद्यानविभागाकडे एकही फाइल पडून नाही. जवळपास ते कोटी रुपयांच्या कामांच्या शंभर फायली असून, त्यात बाकड्यांबरोबरच खेळणी, ट्री गार्ड अशा साहित्यांचा समावेश आहे. कोणाचेही प्रस्ताव मंजूर झालेले नाही. म.ना. तिवारी, प्रभारी उद्यान अधीक्षक जाणिवपूर्वक अडवणूक
मनसेच्या नगरसेवकांच्या प्रभागात बाकडे बसवले जात आहेत. आमदार निधीतील कामे सहज हाेतात. मात्र, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्वनिधीतून सुचवलेल्या कामांना अडवले जाते हे चुकीचे आहे. कविताकर्डक, गटनेत्या,राष्ट्रवादी काँग्रेस