आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्ट पार्किंगवरून वकिलांचा पोलिसांशी वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जिल्हान्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरील पार्किंग बुधवारी पोलिसांनी हटवली. यावेळी वकिलांसह नागरिकांनी पोलिसांना विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. गुरुवारी देखील वकिलांनी वाद घातल्याने कायदेशीर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. निर्बंध कायमस्वरूपी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरील पार्किंग हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दोन महिन्यांपूर्वीच दिले होते. मात्र मनपा आणि पोलिस प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नव्हती. बुधवारी पोलिसांनी न्यायालयाबाहेर रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई केली. वकिलांना कायदा माहिती असूनही नाहक वाद घातला जातो, उच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी कारवाई केली, त्याचा आदर करावा असे आवाहन पोलिसांनी केले. वकील वर्गाकडूनच उल्लंघन होत असल्याने पोलिसांनी नाराजी व्यक्त केली.
अतिरिक्तपोलिस बंदोबस्त : न्यायालयाच्याबाहेर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यालयातील १५ वाहतूक शाखेचा एक अधिकारी पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
पार्किंगच्याठिकाणी वाहने थांबा : बी.डी.भालेकर मैदानावर पार्किंगची सुविधा अाहे. हाकेच्या अंतरावर न्यायालय आहे. येथे वाहने सुरक्षित राहू शकतात.
कारवाई केली जाणार
उच्चन्यायालयाच्या आदेशाचे पालन सर्वांनी करावे. कायदेशीर बाब आहे. हेतुपुरस्सर वाद घातल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रमेशपाटील, वरिष्ठनिरिक्षक, वाहतूक शाखा आदेश पाळावा