आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Buildings,Latest News In Divya Marathi

पालिका इमारतींना पावणे चार कोटींचे अग्निसुरक्षा कवच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनसह तीन विभागीय कार्यालय, एक रुग्णालय व महाकवी कालिदास कलामंदिर या सर्व ठिकाणी पाऊणे चार कोटींची अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर असून, निधीच्या मुद्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

महापालिका मुख्यालयात 1992 मध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली आहे. सद्यस्थितीत ही यंत्रणा कालबाह्य झाल्याचा अग्निशमन दलाचा दावा आहे. दुसरीकडे, शासनाने परिपत्रक काढून नव्याने अग्निशमन यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राजीव गांधी भवनसह पंचवटी, नाशिकरोड व नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयात अग्निशमन यंत्रणा बसविली जाणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात 1985 च्या सुमारास अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली असल्याने, येथेही नवीन यंत्रे बसविली जातील. या व्यतिरिक्त रोप लाँचर सिस्टिम व 11 फायर सूटही खरेदी केले जाणार आहेत.

विशिष्ट ठेकेदारावरून वादाची चिन्हे
अग्निशमन दलाच्या आठ विविध प्रकारच्या खरेदीसाठी एकाच ठेकेदाराची निवड झाली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेवरून स्थायी समिती सभेत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. दुसरी बाब म्हणजे, निविदा किती जादा वा कमी दराने मान्य झाली याचाही तपशील नसल्यामुळे त्यावर पडदा कशासाठी, असाही नवीन सवाल निर्माण झाला आहे.