आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगराध्यक्षांच्या पत्राने येवल्यात खळबळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला - शहरातील दोन रस्त्यांच्या कॉँक्रिटीकरणासाठी सुमारे 17 लाख रुपयांचा विकासनिधी देण्यासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची तांत्रिक मंजुरी रद्द करण्यासाठी नगराध्यक्षा रार्जशी पहिलवान यांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्र दिल्याने खळबळ उडाली आहे.
खासदार चव्हाण यांनी आपल्या खासदार निधीतून शहरातील जब्रेश्वर खुंट ते मोठय़ा महादेव मंदिरापर्यंतच्या रस्ता कॉँक्रिटीकरणासाठी सुमारे साडेसात लाख, तर कंदलकर यांच्या घरापासून ते लोणार गल्लीतील नागपुरे किराणापर्यंतच्या रस्त्यासाठी साडेनऊ लाखांचा निधी मंजूर करावा, यासाठी जिल्हाधिकार्‍यांना 26 जुलै रोजी पत्र दिले होते. मात्र, नगराध्यक्षा पहिलवान यांनी या दोन्ही रस्त्यांच्या कॉँक्रिटीकरणाला तांत्रिक मंजुरी देऊ नये, असे पत्र 8 ऑगस्ट रोजी जीवन प्राधिकरणाच्या मालेगाव येथील कार्यकारी अभियंत्यांना लिहिले आहे. त्यामुळे भाजप व कॉँग्रेसच्या नगरसेवकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.