आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक निधी आता वीस लाख रुपयांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एकीकडे विकासकामांच्या किरकाेळ फाइल काढण्यासाठी नगरसेवक अाक्रमक असताना तिजाेरीतील खडखडाट लक्षात घेत पालिका अायुक्तांनी नगरसेवक निधी एक काेटीवरून थेट २० लाखांपर्यंत अाणण्याचा पवित्रा घेतल्याने नवीन वादाला ताेंड फुटण्याची चिन्हे अाहेत.
नगरसेवकांकडून प्राधान्याच्या फायली काेणत्या याची यादी प्रशासनाकडून मागितली जात असून, नगरसेवकांच्या असंताेषाला अाता सत्ताधारी मनसे कशा पद्धतीने थाेपवते हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे.
अायुक्तांनी सुचविलेल्या अंदाजपत्रकात स्थायी महासभेने १२०० काेटी रुपयांची वाढ केली हाेती, मात्र ही वाढ करताना अपेक्षित उत्पन्नाबाबत दिलेल्या अाकड्यांची शाश्वती नव्हती. दुसरीकडे घरपट्टी, पाणीपट्टी, एलबीटी अशा महत्त्वाच्या करांच्या वसुलीत घट झाल्यामुळे महासभा तर साेडा अायुक्तांच्या अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे अंदाजही चुकण्याची भीती निर्माण झाली अाहे.
अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डाॅ. प्रवीण गेडाम यांनी नेमक्या याच बाबीवर लक्ष केंद्रित करून अार्थिक शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्यंतरी त्यांनी सर्व विभागांना पत्र पाठवून किती रक्कम शिल्लक अाहे प्राधान्याची कामे काेणती याची यादी मागवली हाेती. दुसरीकडे अाधीच अाठ महिन्यांपासून अायुक्त नसल्यामुळे खाेळंबलेली किरकाेळ कामे मार्गी लावावी, यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, पुरेशी तरतूद नसल्यामुळे फायलींना ब्रेक लागत हाेता. या पार्श्वभूमीवर अायुक्तांनी प्रथम सर्व नगरसेवकांना ३० लाख याप्रमाणे निधी देण्याचा पवित्रा घेतला हाेता. त्यासाठी १२२ नगरसेवकांना ३९ काेटी रुपयांपर्यंत निधी लागणार हाेता, मात्र अाता अायुक्तांनी त्यातही प्रति नगरसेवक १० लाख याप्रमाणे कपात केली असून, प्रत्येक नगरसेवकाला विकासकामांसाठी केवळ २० लाखच मिळणार अाहेत.