आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Administration Ignore Complain Start Up

'स्मार्टअॅप’वरील तक्रारींकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्षच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्टसिटीच्या शर्यतीत असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांना वाचा फाेडण्यासाठी "स्मार्टअॅप' सुरू केले खरे. मात्र, त्यावर नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने हे अॅप केवळ देखावा ठरत अाहे.

या अॅपवर तक्रार केल्यावर अाॅटाे जनरेटेड उत्तरापलीकडे काेणतीही कार्यवाही हाेत नसल्याचा सूर अनेक तक्रारदारांनी व्यक्त केला अाहे. ‘तुमची तक्रार मिळाली, तक्रार नोंदविल्याबद्दल धन्यवाद’ एवढेच ठाेक हमखास उत्तर या स्मार्टअॅपच्या माध्यमातून मिळते. मात्र, ही समस्या केव्हा सुटणार, याबाबत काेणताही पक्का ‘शब्द’ मिळत नसल्याने नागरिकांचा भ्रमनिरास हाेताे अाहे. सरतेशेवटी अालेली तक्रार विभागीय पातळीवर पाठवण्याएवढेच अधिकार नियंत्रक अधिकाऱ्यांच्या हातात असून, विभागीय अधिकाऱ्यांना पाठवलेल्या तक्रारींचे निराकरण झाले किंवा नाही, याचा फीडबॅक िनयंत्रक अधिकाऱ्यांकडे येत नसल्यामुळे काेणतीही माहिती देताना त्यांनाही अडचणीचा सामना करावा लागत अाहे. नागरी प्रश्न वा तक्रारींसाठी नागरिकांवर महापालिकेत खेट्या मारण्याची वेळ येऊ नये, प्रामुख्याने गटार वाॅटर मीटरशी संबंधित तक्रारी झटपट सुटाव्यात, यासाठी हे अॅप प्रभावी ठरेल, असा दावा सुरुवातीला करण्यात अाला. प्रत्यक्षात मात्र, तक्रार केल्यानंतर समस्या सुटल्या, अशी उदाहरणे मोजकीच असल्याने हे अॅप केवळ फार्स ठरत अाहे.