आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुक : बहुतांश प्रभागांत तीन जागा निश्चित; एकासाठी शाेध सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय पद्धती असल्याने प्रबळ उमेदवार शाेधणे प्रत्येक पक्षासाठी जिकिरीचे हाेत अाहे. शहरातील बहुतांश प्रभागात प्रत्येकी तीन सक्षम उमेदवार असून, एक उमेदवार अायात करण्याची तयारी सुरू अाहे. या एका जागेसाठीदेखील माेठी चढाअाेढ असल्याचे निदर्शनास येत अाहे. त्यामुळे पालिकेची निवडणूक कमालीची अटीतटीची हाेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात अाहे.

चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे महापालिकेच्या निवडणुकीत माेठ्या पक्षांचे महत्त्व अधिक वाढले अाहे. या पद्धतीमुळे उमेदवारांना एका प्रभागात सुमारे ४५ ते ५० हजार इतक्या मतदारांना सामाेेरे जावे लागणार अाहे. विद्यमान एका प्रभागात सुमारे १० ते १५ हजार इतके मतदार अाहेत. गेल्या निवडणुकीत या सर्व मतदारांपर्यंत पाेहोचण्यातच उमेदवारांची दमछाक झाली हाेती. त्यामुळे अाता इतक्या माेठ्या संख्येने मतदारांपर्यंत कसे पाेहोचावे, याचा विचार करूनच अनेकांना घाम फुटला अाहे. इतक्या माेठ्या संख्येने असलेल्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी सक्षम उमेदवार अाणि सक्षम पक्षाची गरज भासणार अाहे. यापूर्वी एका भागातील वैयक्तिक कामगिरीवर निवडून येण्याची शाश्वती मिळत हाेती. परंतु, प्रभागाचा विस्तार वाढल्याने इच्छुक उमेदवारांना अापल्या कामगिरीचा अालेखही उंचवावा लागणार अाहे.

प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी ज्यातून निवडणूक लढवायची ते प्रभाग निश्चित केले अाहेत. यातील अनेकांचे पक्ष निश्चित हाेणे अजून बाकी अाहे. यापूर्वी निवडणुकीपूर्वीच इच्छुकांचे पक्ष निश्चित असायचे. यंदा मात्र निवडणूक ताेंडावर अाल्यावर अनेकांचे पक्ष निश्चित हाेत अाहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अनेक प्रबळ नेत्यांना संधी मिळणार असली, तरीही बहुतांश ठिकाणी तीन जागांसाठी उमेदवार निश्चित झाले अाहेत. चाैथ्या जागेसाठी बहुतांश ठिकाणी प्रबळ इच्छुक उमेदवाराचा शाेध सुरू अाहे. या जागेवर अन्य पक्षांतील इच्छुकांची नजर अाहे. मात्र, एका जागेसाठी अनेक दावेदार असल्याने सध्या या जागांसाठी संभ्रमावस्था अाहे.

शुभेच्छापत्रांवरही दाेन-तीन इच्छुकांचे फाेटाे : बहुतांशप्रभागात प्रत्येक पक्षाचे जवळपास तीन उमेदवार निश्चित झाले अाहेत. या इच्छुकांनी दिवाळीच्या शुभेच्छापत्र अाणि हाेर्डिंगवर अापले फाेटाे प्रसिद्ध केले अाहे. हे शुभेच्छापत्र अाणि हाेर्डिंग बघून यंदाची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने हाेणार अाहे की काय? असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडू शकताे. मात्र, चाैथा उमेदवार निश्चित नसल्याने तूर्तास तिघांचेच फाेटाे प्रसिद्ध करण्याची वस्तुस्थिती संबंधितांशी चर्चा केल्यानंतर पुढे येते.

काही मंडळी बनली थेट प्रेरणास्थान
चारसदस्यीय प्रभाग पद्धतीत वेगवेगळ्या भागातील इच्छुकांना संधी देण्यावर राजकीय पक्षांचा जाेर असेल. एकाच भागात दाेन इच्छुक वास्तव्यास असेल तर त्यातील प्रबळ इच्छुकाचा विचार हाेऊन दुसऱ्याला एेनवेळेला डच्चू मिळू शकताे. सद्यस्थितीत जे तिघे इच्छुक अाहेत, त्यांचे पॅनल तयार झाले असून, शुभेच्छापत्रांवर या तिघांनीही शुभेच्छा दिल्याचे दिसत अाहे. मात्र, ज्यांना संधी मिळण्याची अाशा धूसर अाहे अशा इच्छुकांची नाराजी अाेढवली जाऊ नये म्हणून त्यांचे फाेटाे चक्क प्रेरणास्थान असलेल्या नेत्यांच्या रांगेत लावण्याची शक्कल काही ठिकाणी लढविल्याचेही दिसत अाहे. तिकीट मिळण्याची मारामार असताना अचानक प्रेरणास्थानाच्या रांगेत अापला फाेटाे बघून संबंधितही काहीसे अवाक‌् झाले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...