आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या खर्चावर गतप्रतिष्ठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रस्त्यांवर अनेक खड्डे, पाण्याचा, घाणीचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. महापालिकेत तसे पाहिले तर खडखडाटच आहे. मात्र, रस्त्यावर झळकणारे फलक असे दर्शवितात की, वा काय सुंदर शहर आहे! प्रत्यक्षात मात्र विकासकामांची बोंबच दिसून येते. लोकप्रतिनिधित्व कालबाह्य झालेले असतानाही महापौर, उपमहापौर, प्रभाग सभापती, नगरसेवक यांच्या नावांच्या फलकांवर अनावश्यक खर्च करण्यात आला आहे.

विकासनिधी पाट्यांसाठी
नगरसेवक निधी, तसेच विभागीय कार्यालयांच्या अखत्यारित असणार्‍या अकस्मात निधीमधून या पाट्यांवर खर्च केला जातो. एखाद्या ठिकाणी चेंबर्स फुटले किंवा रस्त्यावरील खड्डे बुजविणे, पथदीप सुरू करणे, जलवाहिनीची दुरुस्ती अशा ऐनवेळी उद्भवणार्‍या कामांसाठी अकस्मात निधी वापरला जातो. म्हणजेच तातडीने पूर्ण करावयाच्या कामांऐवजी हा निधी मात्र आजी-माजी नगरसेवकांच्या नावांच्या पाट्यांवर खर्च होत असल्याचे समोर आले आहे. तसेच विकासकामांसाठी दिल्या जाणार्‍या नगरसेवक निधीतूनही अनेक जण खर्च करत असल्याचे निदर्शनास आले आहे. एक पाटी बनविण्यासाठी साधारणपणे अडीच ते तीन हजार रुपये इतका खर्च येतो.