आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपला विमा.. अन‌् वैकुंठरथ झाला ‘जमा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कोट्यवधींचेविषय चुटकीसरशी मंजूर करणाऱ्या महापालिकेचा नवीन प्रताप समोर आला असून, अंत्ययात्रांसाठी खरेदी केलेल्या खास वैकुंठरथांचा विमा संपल्यामुळे ते भांडारात जमा करण्याची वेळ आली आहे. परिणामी, दु:ख बाजूला ठेवत या रथांसाठी नातेवाइकांबरोबरच नगरसेवकांनाही धावपळ करावी लागत असून, महापालिकेच्या नादारीबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पार्थिव अमरधामात नेण्यासाठी महापालिका शववाहिका पुरवते. अत्यंत माफक दरात ही सेवा पुरवली जात असल्यामुळे साहजिकच त्याला मागणीही मोठी आहे. महापालिकेने सहा शववाहिका खरेदी केल्या असून, त्यात दोन आधुनिक पद्धतीच्या वैकुंठरथांचा समावेश आहे. खासकरून, वैकुंठरथाला मागणी जास्त असल्यामुळे अग्निशामक दलाची पुरवठा करताना अडचण होत आहे. सद्यस्थितीत शववाहिकांच्या पुरवठ्यावरून नवीन वादाला तोंड फुटले असून, दोन्ही वैकुंठरथ चक्क विमा संपल्यामुळे भांडारात जमा करून ठेवण्याची वेळ आली आहे. दोन शववाहिका दुरुस्तीसाठी भांडारात पाठवण्यात आल्या असून, सध्या केवळ दोन शववाहिकांद्वारे शहरातील मृतदेहांना अंत्यसंस्कारासाठी आणण्याची कसरत करावी लागत आहे. धक्कादायक म्हणजे, कोट्यवधींचे अंदाजपत्रक असलेल्या पालिकेला किरकोळ विमा भरण्याचे त्यामुळे अत्यावश्यक सेवा खंडित होण्याचेही भान राहिलेले नाही.

नगरसेवकांची कसरत अन‌् संताप...
राष्ट्रवादीच्यानगरसेविका छाया ठाकरे रंजन ठाकरे यांनी पालिकेकडे शववाहिकेची मागणी केल्यानंतर हे उघड झाले. चार वाहने भांडारात जमा, तर दोन शववाहिका अन्य ठिकाणी गेल्याचे उत्तर देण्यात आले. त्यानंतर स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडे तक्रार केल्याने त्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले.

खासगी शववाहिकांवर भार
पालिकेच्याशववाहिका बंद असल्यामुळे खासगी वा राजकीय पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या शववाहिका वापरल्या जात आहेत. पालिका १० किमीपर्यंत ७५ रु. त्यापुढे प्रतिकिमी रु. आकारणी करते.