आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदा स्वच्छतेसाठी अाता राेज एक लाखाचा धूर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पालिकेच्या तिजाेरीत खडखडाट असताना गाेदा स्वच्छतेच्या नावाखाली जे काम लाख रुपये महिन्यात बाेटीद्वारे हाेत हाेते, त्याला बंद करून राेज लाख रुपये खर्चून अाधुनिक यंत्राद्वारे करण्याचा घाट घातला अाहे. या संदर्भातील प्रस्ताव महासभेसमाेर अाला असून, अाता नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले अाहे.
नगरसेवकांनी मध्यंतरी महासभेत थेट अायुक्तांना घेरले हाेते, त्यावेळी अायुक्तांनी यंदा जेमतेम हजार काेटीपर्यंत उत्पन्नाचा अंदाजही व्यक्त केला हाेता. जलकुंभासारख्या गरजेच्या याेजनांना मुकणे पाणीपुरवठा याेजनेच्या खर्चातून मार्गी लावण्यासाठी कसा ताेडगा काढला, हेही सांगितले हाेते. उत्पन्नासाठी कसरत करणाऱ्या पालिकेने खर्चाबाबत भीडभाड ठेवल्याचे दिसत अाहे. म्हणूनच की काय, गाेदा स्वच्छतेसाठी अाता दाेन अाधुनिक यंत्रे भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रयत्न अाहे. यापूर्वी महिन्याला तीन लाख रुपये खर्चून बाेटीद्वारे नदीतील निर्माल्य, प्लॅस्टिक इतर कचरा काढला जात हाेता. त्याएेवजी अाता क्लिन इन्फाेटेक या कंपनीला तीन महिन्यांसाठी दाेन यंत्रांसाठी रोज लाख १० हजार रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला. मासिक ३३ लाख खर्च अपेक्षित असून, महिन्यांसाठी ९९ लाखांची तरतूद करण्याची मागणी प्रशासनाने केली अाहे.

महापालिकेतील गाेदावरी संवर्धन कक्ष नावापुरताच
उपायुक्त राेहिदास दाेरकुळकर यांच्याकडे गाेदावरी संवर्धन कक्षाचे कामकाज अाहे. प्रत्यक्षात अपुरे मनुष्यबळ अन्य कारणामुळे विभागाचे कामकाज ठप्प झाले अाहे. या विभागाला काेणतेही काम करायचे असेल तर महापालिकेच्या संबंधित विभागावर अवलंबून राहावे लागत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.