आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Issue At Nashik, Divya Marathi

कामांच्या पाहणीसाठी महापौरांचा पुन्हा दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे सत्ताधारी मनसे पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. सिंहस्थाच्या रखडलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी महापौर अँड. यतिन वाघ यांनी पुढील आठवड्यापासून पाहणी दौर्‍याचे नियोजन केले आहे. दरम्यान, रिंगरोडच्या निकृष्ट कामाबाबत झालेले आरोप लक्षात घेऊन अधिकारी व ठेकेदारांची महापौरांकडून झाडझडतीही होण्याची शक्यता आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आठशे कोटी रुपयांची कामे पालिकेमार्फत केली जात आहेत. यात काही कामे सुरू झाली आहेत. तर काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेपूर्वी साडेचारशे कोटी रुपयांच्या रिंगरोड व रस्ते विकासाच्या कामांचा नारळ मात्र मनसेने फोडून घेतला. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कामे जोमाने सुरू झाली. मात्र, ही कामे सुरू असताना जुन्या रस्त्यांभोवतीच्या साइडपट्टय़ांचे काम करताना कमी खोदाई करणे, निघालेल्या मुरूमाचा वापर पुन्हा तेथेच करणे, माती टाकण्यासारखे प्रकार सुरू असल्याचे आरोप काही लोकप्रतिनिधींकडून झाले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रिंगरोडच्या निकृष्ट कामाच्यानिमित्ताने उगाच सत्ताधार्‍यांवर आरोप नको म्हणून महापौरांनी पाहणी दौर्‍याचा तोडगा काढला आहे. त्यानुसार, प्रथम पाहणी दौरे व त्यानंतर रखडलेल्या कामांचा आढावा घेऊन गती देण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे मुकणे धरणापासूनची जलवाहिनी व साधुग्राममधील कामांसाठीही निविदा प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले जाणार आहे. मनसेच्यादृष्टीने चांगली वातावरणनिर्मिती करण्यासाठी पालिकेतील पदाधिकारी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत