आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Issued Notice To Kazigadhi Residents

काझीगढीवरील दाेनशे रहिवाशांना पालिकेची नाेटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुने नाशिक भागातील काझीगढीचा काही भाग पावसाळ्यात ढासळण्याची भीती व्यक्त करीत महापालिकेने जवळपास २०० रहिवाशांना स्थलांतराच्या नाेटिसा दिल्या अाहेत.
नाेव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर काझीगढीचा काही भाग खचला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर झाेपेत असलेल्या गढीवरील रहिवाशांना तातडीने हलवण्यात अाले हाेते. त्यानंतर काझीगढीच्या संरक्षक भिंतीचा मुद्दा अनेक दिवस गाजला. येथील लाेकांच्या स्थलांतराचा पुनर्वसनाचा प्रश्नही निर्माण झाला.

दरम्यान, पावसाळ्याच्या ताेंडावर पुन्हा पालिकेच्या बांधकाम विभागाने दाेनशे रहिवाशांना स्थलांतराची नाेटीस बजावली अाहे. पावसाळ्यात काेणतीही जीवित वा वित्तहानी झाल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असाही इशारा या नाेटिशीद्वारे देण्यात अाला अाहे. मात्र जागा जाईल, या भीतीने रहिवासी स्थलांतरास विराेध करीत असल्यामुळे माेठा पेच निर्माण हाेऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात काझीगढीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता अाहे.

निधीअभावी घाेंगडे भिजत
काझीगढीसाठीसंरक्षक भिंत बांधण्यासाठी पालिकेने निधी नसल्याचे सांगत हात झटकले हाेते. त्यासाठी २४ काेटी ७६ लाख रुपये लागणार हाेते. त्यानंतर स्थानिक नगरसेवक रंजना पवार यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करीत निधीची मागणी केली. काझीगढी नदीपात्रालगतच्या जलसंपदा खात्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर अाता जलसंपदा खात्याने डिझाइन ड्रॉइंग तयार करण्यासाठी पालिकेकडून १४ लाख रुपये घेतले असून, अाता लवकरच संरक्षक भिंतीचे अंदाजपत्रकही मंजूर हाेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.