आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation LED Light Tender Issue Nashik

न्यायालयाची स्थगिती डावलून एलईडी कंत्राट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - वादग्रस्त एलईडी खरेदीला उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही महापालिकेने रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कंत्राटदाराला ‘बॅकडेटेड वर्कऑर्डर’ दिल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना बडगुजर म्हणाले की, महापालिकेच्या एलईडी खरेदी प्रस्तावाविरोधात आमदार जयप्रकाश छाजेड यांनी विधिमंडळात आवाज उठवल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यास स्थगिती दिली. त्यासाठी चौकशी समितीही नेमली होती. दुसरीकडे, शासनाने 24 ऑक्टोबरला स्थगिती उठवली व 28 ऑक्टोबरला महापालिकेला पत्र आले. त्याचदरम्यान शिवसेनेच्या वतीने नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केल्यावर 13 नोव्हेंबरपर्यंत स्थगिती कायम ठेवण्यात आली. 13 नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी झाल्यावर न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत स्थगिती कायम ठेवली. मात्र, ही बाब न्यायप्रविष्ट असतानाही महापालिकेने 202 कोटी रुपयांचे कंत्राट एका वरिष्ठ मंत्र्याशी संबंधित कंपनीला कार्यारंभ आदेशाने देऊन टाकले. हा एकूणच प्रकार संशयास्पद असून यात मोठय़ा प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. यामध्ये रविवारी शासकीय सुटी असताना या दिवशी कंत्राटदाराला वर्कऑर्डर देण्यात आल्याने हा सर्व व्यवहार संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेने दिलेल्या या आदेश याविरोधात शिवसेना आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.