आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच मिनिटांत दीड कोटींच्या कामांना विनाचर्चा मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सातपूर प्रभागाच्या बैठकीत एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांना विनाचर्चा पाच मिनिटांतच मंजुरी देण्यात आली.

सातपूर प्रभागाच्या बैठकीस सभागृहनेते शशिकांत जाधव, नगरसवेक प्रकाश लोंढे, नगरसेविका उषा शेळके, उषा आहिरे, नंदिनी जाधव, सविता काळे, सुरेखा नागरे, रेखा बेंडकोळी उपस्थित होते. या वेळी राजवाडा येथे कॉँक्रीटीकरण, एमआयडीसीतील रस्त्यावर कॅट आय, सातपूर अग्निशामक केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत कोंडवाडा बांधणे, उद्यानातील खेळणी दुरुस्ती, मॉडर्न स्कूल परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करणे, चेंबर्स दुरुस्त करणे, गटारींची दुरुस्ती करणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली.

जलतरणपटूंचा सत्कार
मालवण येथे झालेल्या चौथ्या राज्यस्तरीय सागरी स्पर्धेत सातपूर येथील जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांच्या सत्काराचा ठराव नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी मांडला. सभापती विलास शिंदे यांनी अनुष्का धात्रक, वैष्णवी कुटे, प्रणीत चाळके, कार्तिकेय कत्रोजवार, साक्षी साळी, साहील निगळ व प्रदीप पगार यांचा सत्कार केला.