आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता हार-तुऱ्यांवरील उधळपट्टी थांबणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिकेने गेल्या काही वर्षात सभा, सत्कार समारंभानिमित्त हार-तुरे, नाश्त्यावर विनानिविदा काेटेशन पद्धतीने केलेली लाखाे रुपयांची उधळण संशयास्पद असल्याचा अाक्षेप वारंवार लेखापरीक्षकांकडून घेतला जात असल्याचे बघून अाता काेठे ही सर्व खरेदीच इ-निविदेद्वारे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. त्यामुळे खाबुगिरीला चाप लागण्याची सुखद अाशा निर्माण झाली असून, तूर्तास जनसंपर्क विभागामार्फत हाेणाऱ्या
खरेदी इ-निविदेद्वारे करण्याच्या हालचाली सुरू अाहेेत.
५० हजारांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करायची असल्यास काेटेशन पद्धतीचा वापर करू नये, अशा सूचना अनेकवेळा लेखापरीक्षकांनी दिल्या अाहेत. त्यापेक्षा अधिक रकमेचा खर्च करण्यासाठी जाहीर निविदा वा गरजेप्रमाणे इ-निविदेचा वापर करणे बंधनकारक अाहे. मात्र, मागील काळात जेवणावळी, नाश्ता, हार-तुरे, पुष्पगुच्छ, साहित्य खरेदीसाठी काेटेशन पद्धतीने काेट्यवधींची खरेदी झाली. परिणामी नियमांचा भंग तर झालाच, मात्र स्वस्तात वस्तूही मिळाल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर अाता जनसंपर्क विभागाने सत्कार समारंभ वा महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी इ-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यास तयारी सुरू केली अाहे. त्याचाच एक भाग म्हणजे वर्तमानपत्रात विविध जाहिरातीही थेट कार्यालयांना िदल्या जाणार असून, एजन्सीसारख्या मध्यस्थांचा संबंध नसेल. छायाचित्रासाठी स्वतंत्र पैसे माेजले जाणार नसून सध्याच्या कर्मचाऱ्यालाच छायाचित्रणाची जबाबदारी िदली जाईल.
'अाप'ने घेतला हाेता अाक्षेप
अाम अादमी पक्षाने गेल्या अार्थिक वर्षात अल्पाेपहार पुष्पगुच्छांवर १५ लाखांची उधळपट्टी केल्याची बाब माहिती अधिकारातून समाेर अाणली हाेती. एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान िदवसाला चार हजार रुपयांचा िनव्वळ चहा-नाश्त्यावर चुराडा लाखांचे पुष्पगुच्छही वाटले गेले. या खर्चात केवळ सत्ताधारी मनसेच नाही, तर सर्वच पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असल्याचे अाराेप हाेते. पालिकेच्या कामकाजाचे वर्षभरात २५० दिवस गृहित धरले, तर लाख ७० हजारांच्या खर्चाची विभागणी करून प्रतिदिन हजारांचा पुष्पगुच्छांचा विचार केला, तर लाख २७ हजार रुपयांची विभागणी करून प्रतिदिन १७०० रुपये खर्ची पडल्याचे समाेर अाले हाेते. हा खर्च माजी पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात असल्याचे सांगत विद्यमान पदाधिकाऱ्यांनी खर्चासाठी अाचारसंहिता अाणल्याचेही स्पष्ट केले हाेते. ५० लाखांचा नाश्ता, तर १७ लाखांचे हार-तुरे २०११-१२ या अार्थिक वर्षातील लेखापरीक्षणात अल्पाेपहारावर ५० लाख ६३ हजारांचा, तर १७ लाख ५७ हजारांचा खर्च हार-तुरे शालीवर झाल्याचे लेखापरीक्षकांनी निदर्शनास अाणून िदले हाेते. हा खर्च काेणावर कधी झाला, याचा तपशील लेखापरीक्षकांनाही उपलब्ध झाल्यामुळे संशय व्यक्त केला गेला अाहे.
अनेक वस्तूंची हाेणार इ-निविदेद्वारेच खरेदी
जनसंपर्क विभागामार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या अनेक वस्तू निविदेद्वारे खरेदी केल्या जातील. महापालिकेच्या जास्तीजास्त पैशांची बचत करण्याचा प्रयत्न असेल. अायुक्तांच्या मार्गदर्शनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही घेतले अाहेत. हरिभाऊ फडाेळ, उपअायुक्त, महापालिका