आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Online App Stuck In Cyber Crime

पालिका ऑनलाइनला धोका सायबर क्राइमचा, पैसे भरूनही थकबाकीची मिळतेय पावती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नागरिकांच्या तक्रारी समस्या जाणून घेण्यासाठी महापालिकेकडून नवीन अॅप तयार केले जात असताना दुसरीकडे मात्र घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी तयार केलेल्या ऑनलाइन यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून करांचा भरणा करूनही थकबाकी असल्याचीच पावती मिळत असल्याच्या काही प्रकारांमुळे ऑनलाइन यंत्रणेच्या या सावळ्या गोंधळाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. महापालिकेच्या ऑनलाइन कर विभागावरही आता सायबर क्राइम करणाऱ्या गुन्हेगारांची वक्र नजर वळल्याची भीती महापालिकेच्याच कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

घरपट्टी पाणीपट्टी हे पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. पालिकेच्या तिजोरीत भर घालणाऱ्या या दोन प्रमुख करांचा भरणा वाढावा, या उद्देशाने महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन यंत्रणा सुरू केली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना आता थेट घरबसल्या अथवा विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून कर भरणा करता येत आहे. परंतु, तरीही थकबाकी असलेल्यांची संख्या अधिक राहात असल्याने पालिकेने थकबाकीधारकांना वर्षाला २४ टक्के दंड आकारण्यास प्रारंभ केला आहे. तर, मुदतीच्या आत भरणाऱ्यांना पालिकेकडून दोन टक्क्यांपासून तर पाच टक्क्यांपर्यंत सूटही दिली जात आहे.
त्यामुळे शेकडो नागरिकांनी मुदतीच्या आतच कर भरणा केला. परंतु, कर भरणा करूनही या ग्राहकांना थकबाकी असल्याच्या पावत्या मिळाल्या आहेत. तर, काही ग्राहकांचे तर चक्क दुसऱ्याच्याच नावाने पैसे भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे भरूनही थकबाकी दाखविल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांद्वारे शहरात वाढलेल्या सायबर क्राइमप्रमाणेच महापालिकेच्या घरपट्टी पाणीपट्टी विभागाच्या ऑनलाइन विभागालाही या प्रकारचा धाेका निर्माण झाल्याची शक्यता माहीतगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून घरपट्टी पाणीपट्टी विभागाच्या ऑनलाइन साॅफ्टवेअरमध्ये अचानक बदल होत आहेत. असे बदल करून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. कर भरूनही थकबाकी दाखवल्याची उदाहरणे असताना कर भरता संपूर्ण रक्कम भरल्याचे दाखवणे अगदीच अशक्य नाही, असे बोलले जात आहे.
सर्व्हर असते नेहमीच डाऊन
विविधकरांचा भरणा करण्यासाठी पालिकेने तयार केलेल्या संकेतस्थळावरील आॅनलाइन यंत्रणेचा अनेकदा बोजवारा उडाला आहे. एवढेच नव्हे तर, पैशांचा भरणा करण्यासाठी आॅनलाइन गेल्यावर वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने ग्राहकांना तासन‌्तास प्रतीक्षा करावी लागते. तसेच, अनेकांना विभागीय कार्यालयांच्या दारी ताटकळत उभे राहावे लागत आहे. सर्व्हर डाऊनची समस्या कायमचीच झाली असली तरी पालिकेच्या तांत्रिक विभागाकडून त्यावर काहीही उपाययोजना केली जात नाही. महत्त्वाचे म्हणजे, सर्व्हरच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे प्रशिक्षित मनुष्यबळच नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पैसे भरूनही थकबाकी...