आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक वाहतूक बेट पालिकेने हटविले,सुरक्षित वाहतुकीसाठी नागरिकांची होती मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वडाळारोड येथील नागजी हॉस्पिटल परिसरातील वाहतूक बेट येथील नागरिकांसह विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनले होते. हे बेट काढावे, अशी मागणी नागरिकांनी प्रभाग 39 मधील ‘दिव्य मराठी विकास मंच’ अभियानाच्या माध्यमातून केली होती. त्यानुसार, महापालिकेने हे बेट काढले.
2 फेब्रुवारी रोजी नगरसेविका वंदना शेवाळे, नगरसेवक गुलजार कोकणी आणि संदीप लेनकर यांच्या प्रभाग 39 मध्ये ‘दिव्य मराठी विकास मंच’ अभियानाच्या कार्यक्रमात नागरिकांनी या वाहतूक बेटाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. नागजी चौकात होणार्‍या अपघातांना आळा बसावा, यासाठी वाहतूक बेट तयार करण्यात आले होते. परंतु, नियोजनाअभावी हे बेट तयार करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. त्यावर उपाय म्हणून सिग्नल उभारण्यात आला. त्यानंतर हा सिग्नल नेहमीच बंद राहत असल्याने या ठिकाणी अपघातात भरच पडल्याने नागरिकांनी वाहतूक बेट हटविण्याची ‘विकास मंच’ अभियानात मागणी केली होती. त्याची दखल घेऊन गुरुवारी हे बेट काढण्यात आले; मात्र सिग्नल बंदच असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढतच आहे. नागजी हॉस्पिटल परिसरातील सिग्नल त्वरित सुरू करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.