आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑगस्टपर्यंत एस्कॉर्ट वसुली केवळ सहा कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एस्कॉर्ट वसुलीमध्ये नाशिक महापालिकेकडून मोठय़ा प्रमाणावर दुर्लक्ष होत असल्याने मागील वर्षी केवळ 18 कोटी, तर आता यावर्षी मे पासून आजपर्यंत केवळ सहा कोटींची वसुली होऊ शकली आहे. या तुलनेत मालेगावसारख्या महापालिकेत मागील वर्षी तब्बल 47 कोटी एस्कॉर्टच्या माध्यमातून मिळाल्याने नाशिक महापालिकेच्या कारभाराविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

शहरात आणि शहराबाहेरून मोठय़ा प्रमाणावर वाहतूक होत असते. त्याचबरोबर पुणे, गुजरात आणि औरंगाबाद महामार्ग असूनही एस्कॉर्ट वसुली मात्र नगण्य असल्याची बाब निदर्शनास आली आहे. जकातीनंतर जकात नाक्यांच्या ठिकाणाहून केवळ एस्कॉर्ट वसूल केला जात असून, त्यासाठी महापालिका 140 कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ वापरत आहे. यामुळे कर्मचार्‍यांची संख्येच्या तुलनेत वसुली होत नसल्याने त्याविषयी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी संशय व्यक्त करीत आर्थिक चणचण असताना महापालिकेने हे शुल्क वसूल करण्यासाठी प्रशासनाने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी, अशी मागणी बडगुजर यांनी प्रशासनाकडे केली आहे.