आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरपट्टीचोरी रोखणार पालिकेची भरारी पथके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- घरपट्टीतील चाेरी वा गळती रोखण्यासाठी आता नव्याने पदभार स्वीकारलेल्या उपायुक्तांनी धडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, अचानकपणे ‘स्पॉट’वर जाऊन क्षेत्र मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली जाणार असून, तसे संकेतही विभागीय कार्यालयात झालेल्या कर वसुली कर्मचाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आले.
महापालिका क्षेत्रात साडेतीन लाख मिळकती नोंदणीकृत असून, एक ते दीड लाख मिळकतींची महापालिकेकडे अद्याप नोंदच नसल्याचा दावा नगरसेवकांकडून केला जात आहे. याव्यतिरिक्त तीन लाख मिळकतींमध्येही क्षेत्र दडवादडवी करून घरपट्टीचोरी होत असल्याचे पुराव्यानिशी आरोप मागील काळात झाले. त्यातून काही बड्या हॉटेल्सचे पितळ उघडे पडल्यावर त्यांच्याकडून दंडात्मक वसुलीही झाली. त्यानंतर पालिका घरपट्टीची गळती रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही. दरम्यान, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर घरपट्टीची गळती रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात उपायुक्त रोहिदास बहिरम यांच्याकडील कामकाजाचा ताण कमी करीत नवीन उपायुक्त रोहिदास दोरपूळकर यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली. दोरपूळकर यांनी गेल्या आठवडाभरात विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन घरपट्टी क्षेत्रातील दडवादडवी रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले. दरम्यान, अचानक काही ठिकाणी मोठे क्षेत्र असलेल्या मिळकतींचेही मोजमाप करण्याचा प्रयत्न असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सवलत योजनेत २३ कोटींची वसुली
दरवर्षी मार्च अखेरीस घरपट्टी वसुलीचे प्रयत्न होत असल्याने मोठ्या प्रमाणात उत्पन्न बुडत होते. यंदा मात्र आयुक्तांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत घरपट्टी भरल्यास भरीव सवलत योजना जाहीर केली. एप्रिलमध्ये घरपट्टी भरली तर टक्के, मे महिन्यात टक्के, तर जूनमध्ये टक्के सवलत देण्यात आली. परिणामी, १२ जूनपर्यंत २३ कोटी ७४ लाख २७ हजार ५०० रुपयांची वसुली झाली आहे. ८८ हजार ५२९ मिळकतधारकांनी सवलत याेजनेचा लाभ घेतला. त्यातून ५८ लाख रुपयांची सवलत संबंधितांना देण्यात आली.
..अशी आहे आकडेवारी
सातपूर
3 कोटी ८६ लाख ९८ हजार १९७
नाशिक पश्चिम
4 कोटी ४५ लाख ३४ हजार ९३७
नाशिक पूर्व
3 कोटी ७४ लाख ७७ हजार ६८३
पंचवटी
2 कोटी ७९ लाख ७७ हजार ०६२
सिडको
3 कोटी ६२ लाख १७ हजार ८३०
नाशिकरोड
5 कोटी २५ लाख २१ हजार ७९१
बातम्या आणखी आहेत...