आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation Separate Rule For Birth And Death Certificate

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची वणवण सुरूच, महापालिकेचे वेगवेगळे नियम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेतील जन्म-मृत्यू विभागात दाखले घेण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूच आहे. विचारणा केल्याच्या तीन दिवसांनंतर दाखले घेण्यासाठी बोलावूनदेखील कधी स्वाक्षरी, तर कधी सर्व्हरची अडचण सांगून नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांत "रेकॉर्ड उपलब्ध नाही' असे नकारात्मक दाखले अनेक नागरिकांना देण्यात आले आहेत.

गेल्या महिन्यात सॉफ्टवेअर असलेला सर्व्हर डाउन झाल्याने हा विभाग नेहमीच बंद असल्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. त्यानंतरदेखील समस्या सोडविण्यात आली असली तरी, नागरिकांना सांगितलेल्या वेळेत दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. दाखल्यासाठी अर्ज करून शुल्क भरल्यानंतर चौथ्या दिवशी जन्म किंवा मृत्यूचा दाखला मिळणे आवश्यक असते. मात्र, अद्याप नागरिकांना आठ-आठ दिवस हेलपाटे घालावे लागत आहे.

तसेच, पूर्व विभागीय कार्यालयात कोणत्याही नावात दुरुस्तीचा अर्ज भरण्यापूर्वी लिपिकांची सही घ्यावी लागत असल्यामुळे नागरिकांची चांगलीच वणवण होत आहे. तसेच, महापालिकेकडे जन्म-मृत्यूच्या काही जुन्या नोंदीचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. त्यामुळेही बऱ्याच वेळा अडचण होते. ज्या नोंदींचे रेकॉर्ड पालिकेकडे उपलब्ध नाही, त्या नोंदींसाठी जर अर्ज आला, तर संबंधित व्यक्तीकडून त्याबाबतची कागदपत्रे, शपथपत्र घेऊन त्यांना रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचा शेरा असलेले दाखले दिले जातात.

जुलै महिन्यापासून सुमारे साडेतीनशे ते चारशे दाखले शहरातील सहाही विभागातून देण्यात आले आहेत. दाखल मिळविण्यासाठी करण्यात येणारा अर्ज हा नियमानुसार जन्म- मृत्यू विभागाकडून योग्य त्या फाॅरमॅटमध्ये मिळणे आवश्यक असते. मात्र, या विभागाकडून तो अर्ज मिळत नाही. त्यासाठी नागरिकांना अर्ज लिहून आणण्याची सक्ती केली जाते. पालिका आयुक्तांनी यात गांभिर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा. कामचुकारपणा करणाऱ्यांंविरुद्ध कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जाते आहे.

नियमांमुळे मनस्ताप शहरातपालिकेची सहा विभागीय कार्यलये आहेत. या सहाही विभागात जन्म-किंवा मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीचे नियम वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी अर्जदारांना विभागीय अधिकाऱ्यांची, तर काही ठिकाणी लिपिकांची सही घ्यावी लागते. तसेच, नावात काही अक्षरांचा फरक असेल, तर त्यातील बदल ठरावीक कर्मचाऱ्यांकडूनच करून द्यावे लागतात.

आयुक्तांच्या आदेशाकडेही दुर्लक्ष..
-गेल्यावर्षी वारंवार निवेदन देऊन तसेच लोकशाहीदिनातही आयुक्तांना याबाबत माहिती दिल्यानंतर आयुक्तांनी १८३४ पासून ते १९६० पर्यंतचे मोडी भाषेतील दाखले मराठीत करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. प्रकाश आहिरे, सेवास्तंभ संस्था
शोधनावळ अर्ज स्वीकारणीच बंद
दरम्यान,पूर्व विभागीय कार्यालयात शहराच्या १८३४ पासून ते १९६० पर्यंतच्या महापालिकाची स्थापना झाल्यानंतरच्या पूर्व विभागातील नागरिकांच्या जुने रेकॉर्ड असल्यामुळे याठिकाणी ज्येष्ठ नागरिक नाव शोधण्यासाठी अर्ज करतात याठिकाणी दररोज किमान शंभर अर्ज येतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून शोधनावळ अर्जच स्वीकारले जात नसल्याचीही बाब समोर आली आहे.

अधिनियमाचेही उल्लंघन
जन्म-मृत्यूनोंदणी अधिनियम १८८६, १९६९, १९७६ २००० नुसार निबंधकास मूळ नोंदीत कोणताही फेरबदल करता, समासात योग्य ती नोंदणी करून ती चूक दुरुस्त करता येऊ शकते किंवा नोंदणी रद्द होऊ शकते. मात्र, महापालिकेच्या विभागीय कार्यालयात असे करता नागरिकांना प्रतिज्ञापत्र मागविले जाते कोर्टात जा तिथे चूक दुरुस्त होणार असे सांगण्यात येतेय.

पाच महिन्यांपासून मारतोय चकरा
-गेल्यापाच महिन्यांपूर्वी जन्म दाखला काढण्यासाठी अर्ज केलेला आहे. या ठिकाणी वारंवार चकरा मारूनही कर्मचारी नसल्याचे उत्तर मिळत आहे. तसेच जुने दाखला काढण्यासाठी अॅफिडेविट लागेल असेही सांगण्यात येत आहे. गुलाबशेख, त्रस्तज्येष्ठ नागरिक