आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"टीडीआर' विरोधात आता व्यूहरचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नऊ मीटरच्या आतील रस्त्यांलगतच्या इमारतींसाठी टीडीआर वापराला बंदी घातल्याने लहान बांधकाम व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रस्तावित नियमाच्या विराेधात हरकती नाेंदविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी व्यूहरचना सुरू केली आहे. ३० मेपर्यंत यासंदर्भातील हरकती नाेंदविता येणार आहेत.

राज्याच्या नगररचना विभागाने नुकताच ‘टीडीआर’ धाेरणाचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात नऊ मीटरखालील रस्त्यावरील भूखंडांवर टीडीआर वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी इमारती उभारताना वा पुनर्विकासात अडचणी येणार असून, प्रामुख्याने ताे छाेट्या बांधकाम व्यावसायिक स्वत:साठी जागा विकसित करण्यापुरता मर्यादित असणार आहे. नऊ मीटरपुढील रस्त्याजवळच्या इमारतींना जादा टीडीआर वापराची परवानगी देण्यात येणार आहे.
शहराचा विचार करता बहुतांश बांधकामे हे नऊ मीटर किंवा त्यापेक्षा अरुंद रस्त्यांजवळच केली जात आहेत. या बांधकाम व्यावासयिकांचा या धाेरणात विचारच करण्यात आला नसल्याने संबंधितांमध्ये नाराजी पसरली आहे.

८०टक्के ले-आऊट सात मीटरजवळ शहरात२००८ पर्यंत जेवढे ले-आऊट विकसित झाले आहेत, त्यातील ८० ते ९० टक्के ले-आऊट हे सात किंवा साडेसहा मीटरच्या रस्त्याजवळचे आहेत. शासनाचा टीडीआरच्या धाेरणाबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यास संबंधित व्यावसायिकांचे माेठे नुकसान हाेणार आहे.

माेठे नुकसान हाेणार
^शासनाची प्रस्तावित नियमावली छाेट्या बांधकाम व्यावसायिकांना जाचक ठरणारी आहे. शहरातील बहुतांश बांधकामे हे मीटरच्या आतील रस्त्यांजवळ सुरू आहेत. या बांधकामांना टीडीआर मिळाल्यास माेठे आर्थिक नुकसान हाेईल. अधिकाधिक बांधकाम व्यावसायिकांनी यावर हरकती नाेंदवाव्यात. -विजय सानप, अध्यक्ष, असाेसिएशन आॅफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर

हरकती, सूचनांनंतरच अंतिम निर्णय
राज्य शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती सूचना नाेंदविता येणार आहेत. या हरकती सूचनांचा विचार केल्यानंतर शासन अंतिम निर्णय जाहीर करेल. या हरकती नगररचना विभागाच्या सहसंचालक कार्यालयात लेखी स्वरूपात नाेंदविता येतील. -प्रकाश भुक्ते, सहसंचालक, नगररचना विभाग
बातम्या आणखी आहेत...