आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी घेणार अाघाडीचा निर्णय; मनसे अपयशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अागामी जिल्हा परिषद, नगरपालिका पालिकांच्या निवडणुकीत स्थानिक स्तरावर नेते जाे निर्णय घेतील ज्या समविचारी पक्षांसाेबत शक्य अाहे, त्यांच्यासाेबत राष्ट्रवादी काँग्रेस अाघाडीचा निर्णय घेणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. नाशिक महापालिकेत सत्तेवरील मनसे मात्र शहर विकासात अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. विशेष म्हणजे, महापालिकेत मनसेबराेबर अापला पक्षही सत्तेत अाहे, याकडे लक्ष वेधले असता उत्तर देण्याचे मात्र तटकरे यांनी टाळले.
अागामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे नाशिकच्या दाैऱ्यावर अाले हाेते. राष्ट्रवादीच्या शहर िजल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना तटकरे बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर अामदार जयवंत जाधव, िजल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, रंजन ठाकरे अादी उपस्थित हाेते.
निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना सुरू असून, राष्ट्रवादी राज्यभरात या निवडणुकांत चांगली कामगिरी करेल, अशी अाशा तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली. पक्षाच्या तिकिटावर निवडून अालेल्या पण अाता इतर पक्षात गेलेल्यांवरही पक्षांतरबंदी कायद्यान्वये कारवाई करीत त्यांना पक्षातून निष्काषित केले जाईल, याकडे लक्ष वेधत ज्यांना जायचे असेल, त्यांनी जावे, पण पक्षाला ब्लॅकमेलिंग करू नये, असा इशारा तटकरे यांनी दिला. माेदी नावाचा करिश्मा संपल्याचे सांगत हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून, राज्यात केंद्रात सत्ता, विदर्भात सर्वाधिक लाेकप्रतिनिधी असतानाही गाेंदिया चंद्रपूरची निवडणूक राष्ट्रवादीने जिंकल्याचा दाखला देत, यांना निवडून देऊन भ्रमनिरास झालाच अाहे. जनता भरडली जात असल्याचा संताप पाहायला मिळताे अाहे. जनमत सरकारविराेधी गेले असल्याचे चित्र पाहायला िमळत असल्याचे त्यांनी सांगितले.

पूरपंचनामेअजूनही नाहीत : पाचिदवस नाशिक शहराच्या विविध भागात पुराचे पाणी घुसले. नागरिकांचे अताेनात नुकसान झाले. मात्र, अजूनही नुकसानीचे पंचनामे नाहीत, मदत नाही, अशी स्थिती अाहे. प्रश्नांची जाण नसलेले लाेक या सरकारमध्ये असल्याने ही अवस्था असून, हे सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका तटकरे यांनी भाजप-शिवसेनेवर केली.

अामच्यामुळेच काँग्रेसचा मुख्यमंत्री
राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी नाशिक दाैऱ्यात म्हटले हाेते. याबाबत तटकरे यांना छेडले असता, त्यांचे नुकसान झाले नाही, तर त्यांचा तीन वेळा मुख्यमंत्री अामच्यामुळे झाल्याचे सांगितले. उलट निवडणुकांच्या अंतिम टप्प्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे नुकसान काँग्रेसला झाल्याची टीका तटकरे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...