आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal Corporation's Health Department Close, Nashik

महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडला विसर; रुग्णांची गैरसोय कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जुलैमहिन्यात ध्वजारोहण होऊन सिंहस्थास आरंभ होत आहे. या कुंभमेळ्यात एक कोटींपेक्षा अधिक भाविक तीन ते साडेतीन लाख साधू-महंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच गेल्या सिंहस्थात सरदार चौकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविकांना त्वरित उपचार मिळाल्याने जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर यंदा काही आपत्ती ओढावल्यास उपचारांसाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, म्हणून जवळपास वर्षभरापूर्वीच महापालिकेच्या जुने नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र ‘आरोग्य कक्ष’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सुरुवातीचे काही दिवस कागदी घोडे नाचवल्यानंतर या कक्षाचे काम ठप्प झाले. आता सिंहस्थ तोंडावर असताना पालिका प्रशासनाला या केंद्राचा विसर पडला असल्याचे दिसून येते. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय रामकुंडापासून अगदी कमी अंतरावर असल्यामुळे या स्वतंत्र कक्षासाठी त्याची निवड करण्यात आली होती. दरम्यान, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागासह शंभर खाटांचे मॅटर्निटी होम, पॅथेलॉजी लॅब, मेडिकल, बालचिकित्सा विभाग, इन्क्युबेटर अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. मात्र, या सुविधाही अद्याप उपलब्ध झाल्यामुळे असंख्य भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

शस्त्रक्रिया विभागातील वातानुकूलित यंत्रणाही बंद
सिंहस्थ काळात महापालिकेच्या लाखो भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासह बिटको रुग्णालय इंदिरा गांधी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमधील वातानुकूलित यंत्रणा गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणा-या रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. सिंहस्थात तरी ही यंत्रणा योग्यरीत्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

हायटेकयंत्रणाही कागदावरच
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय इंदिरा गांधी रुग्णालयात फिजिशियन, सर्जन, ऑर्थोपेडिक्स, न्यूरो सर्जन असे विशेष तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत, म्हणून संबंधित प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाकडे वैद्यकीय अधीक्षकांसह मनपा आयुक्तांकडूनही दुर्लक्षच करण्यात आल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजते. याबरोबरच सिंहस्थासाठी या रुग्णालयांत हायटेक यंत्रणादेखील उपलब्ध करून देण्यात येणार होती. त्याबाबतचा प्रस्तावदेखील अद्याप कागदावरच असल्याचे समजते.

औषध साठाही अपुराच
जुनेनाशिक परिसरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूतीसाठी येणा-या रुग्णांना औषधे मिळत नसल्याबाबतच्या वृत्तावर ‘डी.बी. स्टार’ने प्रकाश टाकला होता. याबाबत वरिष्ठांकडून औषधे उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, अद्यापही रुग्णालयात अनेक औषधांचा तुटवडाच असल्याचे पाहणीत समोर आले आहे.

सिंहस्थापूर्वीच सुविधा उपलब्ध व्हाव्यात...
गोदाघाटापासून अगदी जवळच असलेल्या या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना तत्काळ सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीअगोदरच आरोग्य विभागाने सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. यासाठी वैद्यकीय अधीक्षकांकडे पाठपुरावा करणार आहोत. शबानापठाण, सभापती, पूर्व विभाग
डॉ. राजेंद्र भंडारी, मुख्यवैद्यकीय अधिकारी, मनपा

डॉ. झाकीर हुसेन रुग्णायात येणा-या रुग्णांना, तसेच नातेवाईक, वैद्यकीय अधिका-यांना पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधाच उपलब्ध करून देण्यात आली नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण होते. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने विकत पाणी घ्यावे लागते. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तरी जलवाहिनीचे काम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. मात्र, त्याकडेही पालिका प्रशासनाकडून दुर्लक्षच करण्यात येत आहे.

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रुग्णालयातील बहुतांश यंत्रसामग्री नादुरुस्त आहे. सोनोग्राफी यंत्र नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. मोठ्या प्रमाणावर अस्वच्छताही पसरली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी असलेली टाकीही खराब झाल्याने रुग्णांसह कर्मचा-यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. स्वच्छता कर्मचा-यांअभावी रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुरक्षारक्षक नसल्याने चोरीचे प्रकारही वाढले आहेत. नुकतीच रंगरंगोटी करण्यात आलेल्या भिंतीही पाण्याच्या ओलाव्यामुळे लगेचच खराबही झाल्या आहेत. याकडे मनपा प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी आहेत.

एक्स-रे मशिनसह महत्त्वाची यंत्रणा बंद
डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयासह इंदिरा गांधी रुग्णालयातील एक्स-रे मशिनदेखील गेल्या महिनाभरापासून बंद पडलेले आहे. हे मशीन दुरुस्त करण्याची मागणी काही रुग्णांनी मुख्य वैद्यकीय अधिका-यांकडे केली असता दुरुस्तीच्या कामांना वेळ लागतोच, असे मोघम उत्तर संबंधितांकडून देण्यात आले. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील अनेक महत्त्वाच्या यंत्रणाही गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत आहेत. सिंहस्थात या यंत्रणा कार्यान्वित होतील, अशी आश्वासने देण्यात येत होती, मात्र अद्यापही या यंत्रणांची दुरुस्ती केली गेली नसल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

अनेक विभाग बंदच
डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयाच्या तीन मजली इमारतीत अनेक विभाग सध्या बंदच आहेत. या ठिकाणी दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. येथील अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरू करण्यात यावा, अशा मागण्याही नागरिकांकडून होत आहेत. या ठिकाणी िकत्येक खाटा वापराविना धूळखातच पडून आहेत.