आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात नगर परिषदांच्या निवडणुका २७ नोव्हेंबरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्ह्यातील भगूर, सटाणा, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड या सहा नगर परिषदांच्या निवडणुकांचा प्रशासकीय कार्यक्रम जाहीर करण्यात अाला अाहे. राज्य अायाेगाने ही घाेषणा केल्यामुळे तेथे तत्काळ अाचारसंहिताही लागू झालेली अाहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज २४ ते २९ ऑक्टोबरदरम्यान दाखल करता येतील. २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नाेव्हेंबरला निकाल जाहीर होणार अाहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येणार अाहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील उपराेक्त नगर परिषदांच्याही निवडणुका होणार आहेत. जिल्हाधिकारी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम बुधवारी (दि. १९) जाहीर करतील. तत्पूर्वीच आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाच्या दिवसापासून म्हणजे साेमवारपासून या सर्व नगर परिषदांच्या हद्दीत आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापासून निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्येही उमेदवारांची शोधमोहीम आणि इच्छुकांची मोर्चेबांधणी याला वेग अालेला अाहे.
स्वतंत्रआचारसंहिता कक्षाची उभारणी : प्रत्येकनगर परिषदेत स्वतंत्र आचारसंहिता कक्ष उभारला जाणार आहे. तेथूनच त्या-त्या क्षेत्रात आचारसंहितेचे पालन होते की नाही, यावर नियंत्रण ठेवले जाईल. तसे आदेशही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांनीही आचारसंहितेची अंमलबजावणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या : सहानगर परिषदांसाठी स्वतंत्ररीत्या उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करण्यात अाली आहे. तर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनमाड, येवला आणि भगूरला तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सटाणा, नांदगाव आणि सिन्नरला नगर परिषदांचे मुख्याधिकारीच कामकाज पाहणार आहेत.

नगर परिषदांची सदस्य संख्या
भगूर १७
सटाणा २१
सिन्नर २८
येवला २४
नांदगाव १७
मनमाड ३१

नगराध्यक्षपदांचे आरक्षण
{मनमाड: सर्वसाधारण महिला
{सिन्नर : अनुसूचित जमाती
{सटाणा : सर्वसाधारण
{येवला : सर्वसाधारण
{नांदगाव : ओबीसी
{भगूर : सर्वसाधारण महिला

नाशिक | अारक्षणांमुळेथेट निवडीद्वारे हाेणारी नगराध्यक्षपद निवड सत्ताबदलाचे संकेत देत अाहे. मनमाड, सटाणा, येवला येथे तर स्पष्टपणे बदलाचे वारे अाहेत. सिन्नरमध्ये मात्र युतीतील भाजप-सेनेच्याच उमेदवारांमध्ये लढत हाेऊ शकते. मनमाडचे नगराध्यक्षपद सद्यस्थितीत शिवसेनेकडे आहे. सध्याच्या सर्वसाधारण महिला आरक्षणानुसार युती झाली तर ते युतीकडे जाऊ शकते. राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेत दाखल झालेले असल्याने सेनेचे बळ वाढले आहे. युती झाली नाही तर शिवसेना अव्वल, काँग्रेस दुसऱ्या, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर जाणे शक्य अाहे. अशा स्थितीत सदस्यसंख्या अाणि नगराध्यक्षपदही सेनेकडे जाऊ शकते. सटाणा पालिकेत नगराध्यक्षपद सध्या राष्ट्रवादीकडे अाहे. परंतु, सध्याच्या सर्वसाधारण आरक्षणामुळे ते अपक्षांकडे जाण्याची शक्यता आहे. विकासकामे झाल्याने राष्ट्रवादीबद्दल नाराजी अाहे. चार टप्प्यात हाेणार मतदान लागू झाली आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी संगणक प्रणाली : आगामीकाळात मुदत संपत असलेल्या राज्यातील १९० नगर परिषदा नगर पंचायती; तर नवनिर्मित नगर परिषदा १६ नगर पंचायतींचा यात समावेश करण्यात आला आहे. राज्यातील या सर्वच नगर परिषदांसाठी बहुसदस्यीय पद्धतीनुसार आणि थेट अध्यक्षपदांसाठी निवडणूक होणार आहे. तर नगर पंचायतींच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने होतील. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे शपथपत्रे सहज भरता यावीत म्हणून खास संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून या माध्यमातून उमेदवारांची सोय व्हावी त्यात पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून काळजी घेण्यात आली आहे.
जातवैधता प्रमाणपत्राचा पुरावा : संबंधितनगर परिषदांच्या राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोच पावती सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद केली आहे.

विभागात ३० ठिकाणी निवडणुका
नाशिकरोड | या कार्यक्रमानुसार नाशिक विभागातील ३० नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये निवडणुका हाेतील. त्या सर्व ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील आहेत. {नाशिक - मनमाड, सिन्नर, येवला, सटाणा, नांदगाव , भगूर {अहमदनगर - संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहाता, पाथर्डी, राहुरी, देवळाली प्रवरा {नंदुरबार - शहादा { धुळे - शिरपूर-वरवाडे, दोंडाईचा-वरवाडे { जळगाव - भुसावळ, चोपडा, अंमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, एरंडोल, धरणगाव, पारोळा, बोदवड.
बातम्या आणखी आहेत...