आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवाळी अनुदान; अाज महापालिकेचा फैसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळी पंधरा दिवसांवर अाली असतानाही तब्बल हजार ९० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसह मानधनावरील हजाराहून अधिक महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळत नसल्यामुळे महासभेत शिवसेनेने अाक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, महापाैर अशाेक मुर्तडक यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता सर्व गटनेते, कर्मचारी संघटनांची बैठक बाेलवली अाहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान दिले जाते. साधारण महिनाभर अाधी अनुदान मिळाले तर दिवाळीनिमित्त खरेदी करणे शक्य हाेत असल्याचे कर्मचाऱ्यांचे नेहमीच म्हणणे असते. प्रत्यक्षात, दरवर्षी दिवाळी ताेंडावर येईपर्यंत अनुदान देण्यावरून घाेळ सुरू असताे. चालू वर्षीही हाच घाेळ सुरू असून, वास्तविक अाॅगस्टमध्येच जादा विषयात सानुग्रह अनुदान देण्याचा विषय मंजूर असतानाही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. महासभेच्या सुरुवातीला विनायक पांडे यांनी पत्र देऊन सानुग्रह अनुदानाचा मुद्दा मांडला. त्यावर शिवसेनेचे सदस्य अाक्रमक झाले. त्यानंतर महापाैरांनी दिवाळी अनुदानाचा निर्णय घेण्यासाठी शनिवारी सकाळी बैठक घेऊन त्यात उपमहापाैर, स्थायी समिती सभापती, सर्व गटनेते, कर्मचारी संघटनांची बैठक घेऊन निर्णय हाेईल, असे स्पष्ट केले.

यंदा १७ हजार रुपयांची मागणी
गेल्यावर्षी १३ हजार १५० रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी महापालिकेने केली हाेती. मात्र, ११,१५० याप्रमाणे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात अाले हाेते. यंदा १७ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात अाली अाहे.

७५ कर्मचारी अनुकंपावर...
अनुकंप तत्त्वावर ७५ कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी महापाैरांनी तत्काळ कारवाईचे अादेश दिले. यासंदर्भातील अहवाल तत्काळ महासभेसमाेर सादर करून निर्णय घ्यावा, असेही सांगितले. प्रकाश लोंढे यांनी सिंहस्थात अतिरिक्त काम केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना विशेष अनुदान वाढ देणार काय, असाही सवाल केला.

महापाैरांचा टाेमणा, शिवसेनेत श्रेयवाद
सानुग्रहअनुदान मंजूर करण्याच्या मागणीवरून शिवसेनेने चक्क सभागृहात उभे राहून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला. त्यामुळे सारेच अावाक झाले. वास्तविक दरवर्षी सानुग्रह अनुदान दिले जातेच त्याचा घाेळही अखेरपर्यंत सुरू राहताे हे बघून महापाैरही गाेंधळले. त्यांनी शिवसेनेवर हल्लाबाेल करीत अनुदानाच्या मागणीसाठी उभे राहून शक्तिप्रदर्शनाची गरज काय, असा सवाल करीत टाेमणा मारला. दरम्यान, यानिमित्ताने शिवसेनेत श्रेयवाद लपून राहिला नाही. विनायक पांडे यांनी सानुग्रह अनुदानाबाबत पत्र दिल्यामुळे शिवसेनाप्रणीत महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी सहाणे यांच्या चेहऱ्यावरील निराशा लपून राहिली नाही. यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी तसेच अनुदानाचा प्रस्ताव १६ अाॅगस्ट २०१६ राेजी महासभेत मंजुरीसाठी सहाणे यांनीच जाेर लावला हाेता.
बातम्या आणखी आहेत...