आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी अाता महापालिकेचे इ-टाॅयलेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्मार्टसिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या बाेटावर माेजण्याइतकी अाहे. या व्यवस्थेअभावी हाेणारी कुचंबणा त्यामुळे अाराेग्यावर हाेणारे दुष्परिणाम लक्षात घेत महिला बालकल्याण समितीने खासगीकरणातून इ-टॉयलेट उभारण्याचा निर्णय घेतला अाहे.
त्यासाठी खासगीकरणातून तसेच पालिका स्वत:ही प्रायाेगिक तत्त्वावर शाैचालये खरेदीच्या विचारात अाहे. ‘दिव्य मराठी’ने ‘सहकारातून समस्यामुक्ती’ उपक्रमांतर्गत देशात खासगीकरणातून चालणाऱ्या इ-टाॅयलेट व्यवस्थापनाचा पाठपुरावा केला हाेता.

उच्च न्यायालयात ‘मिळून साऱ्या जणी’ या संस्थेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिलांच्या हाेणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधले हाेते. त्यानंतर न्यायालयाने सर्व महापालिकांना महिला स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याचे अादेश िदले हाेेते. त्यानुसार, शहरात पालिकेने सर्वेक्षणही केले हाेते. मात्र, अार्थिक तरतूद काेठून करायची, असा प्रश्न हाेता. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांनी केरळमध्ये खासगीकरणातून उभारलेल्या स्वच्छतागृहांची माहिती घेतली. त्यानंतर महिला बालकल्याण समिती सभापती वत्सला खैरे यांच्याशी चर्चा करून तरतूद करण्याची मागणी केली.

काॅइनबाॅक्स व्यवस्थापन : केरळातहायटेक स्वच्छतागृहे अाहेत. यात एक रुपयाचे काॅइन टाकल्यानंतर स्वच्छतागृह उघडते. यात अाॅटाे फ्लॅशची व्यवस्था असून, सर्व कामे मनुष्यविरहित हाेते. या सर्व व्यवस्थेमुळे स्वच्छतागृह चांगले राहण्यास मदत हाेते, असेही साेनवणे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात साधारण स्वच्छतागृहे खरेदी करून व्यवस्थापनासाठी देण्याचा विचार असल्याचे सांगितले.

खासगीकरणातून करणार व्यवस्था
गेल्या वर्षी एका संस्थेने शहरातील १२ स्थळांचे सर्वेक्षण करून तेथे माेफत स्वच्छतागृह बसवण्याची तयारी दर्शवली हाेती. त्या बदल्यात पालिकेने जागा स्वच्छतागृहाच्या जागेत जाहिरातीस मुभा देऊन त्या उत्पन्नातून व्यवस्थापनाची याेजना हाेती.

प्रायाेगिक तत्त्वावर विचार
महिलांचीहाेणारीकुचंबणा लक्षात घेता, सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी वेग िदला जाणार अाहे. यासंदर्भात अायुक्तांशी चर्चा करून महासभेच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णय हाेईल. - जीवन साेनवणे, अतिरिक्तअायुक्त, महापालिका