आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिका निवडणुकीसाठी साेशल मीडियाला कवेत घेण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेची निवडणूक चार वाॅर्डांचा एक प्रभाग अशी हाेणार असल्याने विस्तृत मतदारसंघाच्या शेवटच्या टाेकापर्यंत पाेहाेचण्यासाठी उमेदवारांची दमछाक हाेणार अाहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी अातापासूनच तयारी सुरू केली असून, साेशल मीडियाचा अाधार घेतला अाहे. फेसबुक अाणि व्हाॅट‌्सअॅपचे बारकाईने अवलाेकन केल्यास इच्छुकांनी अापल्याशी संबंधित प्रत्येक घडामाेडी अपलाेड करण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येते. अर्थात ज्यांना यासाठी वेळ नाही किंवा साेशल मीडियाविषयी फारसे ज्ञान नाही त्यांनी काही एजन्सीजला बेकायदा भाडे देऊन अापले फेसबुकचे अकाउंंट अपडेट करायला दिले अाहे. शिवाय या मंडळींकडून व्हाॅट‌्सअॅपवरही संदेश पाठविले जात अाहेत.
लाेकसभा अाणि विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक माेलाची भूमिका बजावली ती फेसबुक, व्हाॅट‌्सअॅप अाणि व्टि‌्टरसारख्या साेशल मीडियाने. उमेदवाराच्या प्रचारापासून विराेधकांच्या अपप्रचारापर्यंतचे सर्वच काम या साेशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात अाले हाेते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे माध्यम युजर्स फ्री असल्यामुळे सर्वसामान्य मतदारही प्रचाराच्या कामत हिरिरीने सहभागी हाेत हाेते. परिणामी संपूर्ण निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांचे वर्चस्व राहिले. हीच बाब कॅश करीत नरेंद्र माेदी यांनीही साेशल मीडियाचा वारेमापपणे वापर करून घेतला हाेता. िदल्ली विधानसभा निवडणुकीतही साेशल मीडियाचा माेठ्या प्रमाणात वापर झाला.

साेशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नाशिकमधीलही स्थानिक नेत्यांनी या माध्यमाला कवटाळणे सुरू केले अाहे. काही महिन्यांनंतर महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक हाेणार अाहे. ही निवडणूक प्रभागनिहाय हाेणार असल्याने मतदारसंघाची व्याप्ती वाढणार अाहे. अशा परिस्थितीत मतदारांपर्यंत अापले काम पाेहाेचविण्यासाठी संबंधितांनी अातापासून साेशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात केली अाहे. त्यासाठी विविध कन्सल्टन्सी अाणि एजन्सीजचा वापर करण्यात येत अाहे.

महिन्यालादाेन ते अडीच हजार रुपये शुल्क...
एकाअकाउंटसाठी महिन्याकाठी दाेन ते अडीच हजार रुपयांपर्यंत शुल्क अाकारले जाते. याबराेबर बल्क एसएमएस अाणि व्हाॅट‌्सअॅपच्या संदेशांचीदेखील सेवा पुरविली जाते. यातून माेठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळविली जाते.

काय करतात एजन्सी?
विविध एजन्सी मार्फत इच्छुकांचे फेसबुक अकाऊंट अपडेट ठेवणे, दिनविशेष टाकणे, महापुरुषांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणे, राजकीय हालचालींवर भाष्य करणे, विकास कामांच्या उदघाटनांचे फाेटाे टाकणे, बातम्यांची कात्रणे टाकणे अादी कामे फेसबुक अाणि व्हाॅटस अॅपवर टाकले जाते. यासह विराेधकांचे घाेटाळे, वादग्रस्त वक्तव्य अादींचा समाचार घेण्याचे कामही यात केले जाते.
बातम्या आणखी आहेत...