आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता ४६ दिवस फक्त ‘निवडणूक एके निवडणूक’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य निवडणूक अायाेगाने बुधवारी दुपारी महापालिका निवडणुकीसाठी अाचारसंहिता लागू केल्यानंतर राजीव गांधी भवन मुख्यालयात शुकशुकाट पसरला. एरवी दुपारनंतर नगरसेवकांची असणारी वर्दळ तर थांबलीच, शिवाय अधिकारीही बैठकीत व्यस्त असल्याने लाेकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. 

महापालिका निवडणूक २१ मार्च राेजी हाेणार असून, त्यासाठी अादर्श अाचारसंहिता जाहीर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीची सर्वांनाच प्रतीक्षा हाेती. नगरसेवकांनी तर महासभेलाही येणे बंद केले हाेते. अखेरच्या महासभेत १२२ पैकी ४१ नगरसेवक हजर हाेते. दरम्यान, विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अाठवडाभरापूर्वीच अाचारसंहिता लागल्यामुळे महापालिकेवर बंधने अाली हाेती. महापालिकेने कामे मंजुरीला ब्रेक लावला हाेता. 
 
त्यामुळे महासभेत धाेरणात्मक निर्णय झाले नव्हते. महापालिकेचा विकास अाराखडा केवळ त्यास अपवाद ठरला. अर्थात, राज्य निवडणूक अायाेगाची शासनस्तरावरून मंजुरी घेऊन कार्यवाही झाल्यामुळे त्याबाबत प्रश्च राहिला नव्हता. अाता मतदानासाठी अवघे ४६ दिवस बाकी असून, पुढील ४६ दिवस महापालिकेला काेणताही धाेरणात्मक निर्णय घेता येणार नाही. महापालिकेची अत्यावश्यक कामे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मंजूर करता येतील. दरम्यान, ठेकेदारांची नेहमीप्रमाणे असलेली वर्दळही थांबणार असून, अाता महापालिकेतील नवीन सत्ता स्थापनेनंतर माेठ्या कामांसाठी प्रक्रिया हाेईल. ताेपर्यंत जुन्या कामांसंदर्भातील देयकांसाठीच ठेकेदारांची गर्दी राहणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...