आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अामदारांना पालिका निवडणुकीचे दार बंद, पालिका अधिनियमातील तरतुदीमुळे पत्ते कट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नगरसेवक अामदारांना सहा महिन्यांनी हाेणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी दरवाजे बंद असून, महापालिका अधिनियमामुळे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य असताना कनिष्ठ सभागृहाचे सदस्य हाेता येत नसल्याच्या तरतुदीमुळे पुन्हा नगरसेवकपदाच्या बाेहल्यावर चढू इच्छिणाऱ्या अामदारांची निराशा हाेणार अाहे.
एकीकडे ‘एक व्यक्ती-एक पद’ या तत्त्वानुसार वाटचाल करण्याची भाषणे प्रत्येकच राजकीय पक्षाचे नेते करीत असतात. जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये नवीन पदाची संधी मिळेल, अशी अाशा तेवत ठेवण्याचेही काम हाेत असते. प्रत्यक्षात वेळ अाल्यावर माेठी पदे भूषवणाऱ्यांकडून छाेट्या पदाचा त्याग करण्याची उदारता दाखवली जात नाही. नगरसेवक असताना अामदार झालेल्यांची उदाहरणे त्यासाठी अत्यंत मूर्तिमंत ठरतात. सध्या भाजपचे बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डाॅ. राहुल अाहेर, अपूर्व हिरे हे पाच अामदार असून, दाेन वर्षांपूर्वी विधिमंडळाचे सदस्य झाल्यानंतरही त्यांनी कनिष्ठ सभागृह असलेल्या महापालिकेचे सदस्यत्व अर्थातच नगरसेवकपद साेडले नव्हते. लाेकसभा, विधानसभेची निवडणूक लढवताना नगरसेवकपदाचा राजीनामा देणे बंधनकारक असते. जिल्हा परिषदेत अामदार झाल्यावर सदस्यपद साेडणे क्रमप्राप्त असते. मात्र, अामदारकी असतानाही महापालिका सदस्यपद कायम ठेवण्याच्या नियमामुळे संबंधितांची पदे सुरक्षित राहिली. मात्र, अाता नगरसेवकपदावरून पायउतार झाल्यावर अामदारांना पुन्हा या पदाच्या बाेहल्यावर चढण्याची संधी नाही. याचे कारण म्हणजे महापालिका अधिनियमात नगरसेवक काेणाला हाेता येते, या तरतुदीत दडले अाहे. त्यात संसद वा विधिमंडळ सभागृह हे वरिष्ठ असल्यामुळे त्यापेक्षा कनिष्ठ सभागृहाचे सदस्य हाेता येत नाही, अशी अामदारांसाठी तरतूद अाहे. त्यामुळे सहा महिन्यांनी हाेणाऱ्या निवडणुकीत कुटुंबातील किंवा समर्थकांपैकी काेणालाही नगरसेवकपदासाठी उतरवणे याशिवाय अामदारांना पर्यायच उरलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...