आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा मनसेसह सेनेला ‘दे धक्का’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची पडझड सुरूच असून, विद्यमान स्वीकृत नगरसेवक हरिभाऊ लाेणारी यांनी भाजपमध्ये रविवारी (दि. २३) प्रवेश केला. दुसरीकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे अाणि विशाल संगमनेरे यांच्यासह नांदगावचे माजी अामदार संजय पवार यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपमध्ये प्रवेश केला.
शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या उत्तर महाराष्ट्राच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश साेहळा झाला. यावेळी अामदार बाळासाहेब सानप, वसंत गिते, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, सतीश कुलकर्णी, डाॅ. प्रशांत पाटील अादी उपस्थित हाेते.

मनसेचे स्वीकृत नगरसेवक हरिभाऊ लाेणारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने प्रभाग क्रमांक १३ ची निवडणूक अधिक चुरशीची हाेणार अाहे. या प्रभागात शिवसेनेचे पॅनल बळकट झाले असून, त्यात माजी महापाैर विनायक पांडे, अॅड. यतीन वाघ, नगरसेवक विनायक खैरे यांची कन्या एकता यांची उमेदवारी जवळपास निश्चित समजली जात अाहे. यापॅनलला अाव्हान देण्यासाठी अाता विजय साने, हरिभाऊ लाेणारी, सतीश शुक्ल, गणेश माेरे, अशाेक गाेसावी, प्रफुल्ल संचेती, नरेंद्र पवार, अजिंक्य साने, नगरसेविका माधुरी जाधव यांच्यासह अन्य काही दावेदार अाहेत.
उपनगर परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये निवडणूक लढविण्यासाठी सेनेचे माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अाहे. नाशिकराेड येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये निवडणूक लढविण्यासाठी मनसेचे नगरसेवक अशाेक सातभाई यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला अाहे. त्यामुळे सेनेचे तालुका उपाध्यक्ष विशाल संगमनेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अाहे. सेनेचे माजी महानगरप्रमुख दत्ता गायकवाड यांचे ते निकटचे नातेवाईक अाहेत. जिल्हा परिषदेच्या अागामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी अामदार संजय पवार यांनी सेनेला साेडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश घेतला. सेनेच्या अामदारकीनंतर ते राष्ट्रवादीत प्रवेशित झाले हाेते. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर ते पुन्हा सेनावासीय झाले हाेते.

राष्ट्रवादीची मंडळी भाजपात : राष्ट्रवादीचेपदाधिकारी भगवान दाेंदे, काझी बाबा, भाऊसाहेब नवले, बाकेराव डेमसे, हरी गांगुर्डे, पप्पू दाेंदे, गाैतम दाेंदे, संताेष पवार यांनीही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मनसे नगरसेवक हरिभाऊ लाेणारी, सेनेचे अनिल ताजनपुरे यांनी भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी अा. बाळासाहेब सानप, विजय साने अादी.
बातम्या आणखी आहेत...