आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला हेरण्यासाठी सेनेला अाता राष्ट्रवादीचीही साथ, भुजबळ प्रकरणाचा राग काढण्याची चाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजपला पालिका निवडणुकीत धाेबीपछाड देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असतानाच, अाता राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनीही भाजपवर शरसंधान साधायला सुरुवात केली अाहे. भुजांचे बळ कमी करण्यासाठी भाजपकडून सुरू असलेले प्रयत्न पालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने ही रणनीती अाखल्याचे सांगण्यात येते. महासभांमध्येही भाजपला चहूबाजूने हेरण्यासाठी शिवसेना, रिपाइं अाणि राष्ट्रवादी काही मुद्यांवर एकत्र येत असल्याचे दिसत अाहे.
राज्यात भाजप-सेना महायुतीचे सरकार असले तरीही दाेन्ही पक्षांतील बेबनाव वारंवार उफाळून आल्याची उदाहरणे अलीकडे वाढली अाहेत. अागामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर भाजपवर हल्लाबाेल करण्याचीच नीती सेनेने ठरविली अाहे. विदर्भ मराठवाड्याविषयी साेयीची भूमिका घेतली जात असताना, नाशिकवर अन्याय हाेत असल्याचा दावा करत, दाेन महिन्यांपूर्वी सेनेने भाजपविराेधात विराट माेर्चा काढला हाेता. त्यानंतर स्वतंत्र मराठवाड्याची मागणी ही लाेकभावनाच असल्याचे मत व्यक्त करणाऱ्या राज्य महिला अायाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी राडा केला हाेता. या सर्व प्रकरणांमुळे शिवसेना भाजपमध्ये तणाव अाहे.

पालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचे संकेत भाजप राज्य कार्यकारिणी बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांना दिले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीही ‘एकला चलाे रे’चा नारा देत तयारीला लागण्याचे अादेश दिले. त्यामुळे अाता सेना-भाजप अशीच टस्सर हाेणार असा अंदाज बांधला जात अाहे. परंतु, दाेघांच्या भांडणाचा एकतर्फी लाभ उठविण्याएेवजी राष्ट्रवादीही अाता या भांडणात पडून भाजपवर तुटून पडण्याचा प्रयत्न करत अाहे. पाण्याच्या मुद्यावरूनही महासभांमध्ये वारंवार भाजपवर राष्ट्रवादीकडून शरसंधान साधण्यात अाले. राष्ट्रवादीचे अामदार जयवंत जाधव हेदेखील भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या गटनेत्या कविता कर्डक यांनी ‘हमारी भूल, कमल का फूल’ असे लाेक म्हणू लागल्याचे महासभेत सांगत भाजपविषयी राग व्यक्त केला. शिवसेनेविषयी मात्र राष्ट्रवादीची अतिशय मवाळ भूमिका असल्याचेही प्रकर्षाने दिसत अाहे.

मरगळ दूर करण्यासाठीच प्रयत्न
छगन भुजबळ यांच्या शहरातील अस्तित्वाने पक्षात नेहमीच उत्साह असायचा. त्यांच्या अटकेने पक्षात मरगळ आली अाहे. या अटकेनंतर एका ज्येष्ठ नगरसेवकाने पक्ष साेडून शिवबंधन बांधले. अन्य काही इतरत्र जाण्याच्या तयारीत अाहेत. पालिका निवडणूक ताेंडावर अाली असताना ही मरगळ पक्षाच्या अस्तित्वालाच धाेकेदायक असल्याची भीती पदाधिकाऱ्यांना वाटत अाहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी भुजबळांच्या अटकेचा राग व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपलाच पहिले ‘लक्ष्य’ केल्याचे बाेलले जातेय.
बातम्या आणखी आहेत...