आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिकिटासाठी मोर्चेबांधणी, नाशिक महापालिका निवडणूक तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - नाशिकरोड विभागात प्रभाग झाले असून, दसक-पंचकच्या गोदावरी तीरापासून ते वालदेवी तीर आणि पिंपळगाव खांबपर्यंत एवढ्या मोठ्या भागातून २३ नगरसेवक जनतेचा विकास करणार आहेत. मात्र, विकास करण्यासाठी सूत्रे कोणाच्या हवाली करायची, यासाठी जनता ठरविणार असली तरी आम्ही यासाठी कसे पात्र आहोत हे दाखविण्यासाठी इच्छुक तयारीला लागले आहेत. यामध्ये सर्वच इच्छुकांनी पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी केली असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर आपणच उमेदवारीसाठी कसे सक्षम आहोत हे दाखविण्यासाठी मध्यस्थांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. तर विद्यमान नगरसेवकांनी उमेदवारी ग्राह्य धरली असली तरी मातब्बरांना पक्षप्रवेश दिल्याने वेळेवर कोणाचा पत्ता कट करेल हे सांगता येत नाही.
नाशिकरोड विभागात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी महानगरप्रमुख दत्ता गायकवाड, तर भारतीय जनता पार्टीचे आमदार बाळासाहेब सानप यांचे वास्तव्य असल्याने त्यांच्या नेतृत्वावरच इच्छुकांची उमेदवारी अवलंबून राहाणार आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार अजूनही असल्याने या पक्षाकडून निवडणूक लढविणारेही तयारीला लागले. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही द्विधा मानसिकतेमध्ये असल्याचे दिसून येत आहे. अजूनही राज ठाकरे आपली जादू दाखवतील या विश्वासावर कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. नाशिकरोड विभागात सर्वात मोठा म्हणजे ५० हजार ५०९ मतदार असलेल्या प्रभाग १७ मधून अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण आरक्षणासाठी इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी तसेच निवडणुकीचा अभ्यासही सुरू केला आहे. यामध्ये शैलेश ढगे, बाबूराव आढाव, मंगला आढाव, दिनकर आढाव, पंकज गाडगीळ, नितीन चंद्रमोरे, तानाजी लोखंडे, प्रमोद साखरे, यशवंत पागेरे, नरेंद्र आढाव, प्रवीण पवार, शशिकांत उन्हवणे, ललिता भालेराव, संजय भालेराव,सुनंदा मोरे, तर १८ मधून पवन पवार, रंजना बोराडे, अशोक सातभाई, रतन बोराडे, मंदाबाई ढिकले, शरद मोरे, शिवा ताकाटे, विक्रम खरोटे, वंदना चाळीसगावकर,अजित बने, प्रभाग १९ मधून राजश्री अरिंगळे, पुंडलिक अरिंगळे, हरीश भंडागे, शोभा आवारे, वैशाली भागवत, शिवाजी भागवत, कन्हैया साळवे, केशव बोराडे, अंबादास ताजनपुरे, संतोष साळवे, अमोल पगारे, सुनील कांबळे, सत्यभामा गाडेकर, प्रभाग क्रमांक २० मधून गिरीश मुदलियार, संग्राम फडके, सविता दलवाणी, संभाजी मोरुस्कर, राजन दलवाणी, गोपी अलठक्कर, निवृत्ती अरिंगळे, प्रताप मेहरोलिया, प्रभाग २१ मधून योगिता देवकर, श्याम खोले, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, संगीता गायकवाड, सुधाकर जाधव, जयश्री गायकवाड, शिरीष लवटे, कुमार गायकवाड, विक्रम कदम, गंगाधर उगले, कोमल मेहरोलिया, शिवाजी सहाणे, अशोक चोरडिया, नितीन चिडे, अस्लम मनियार, तर प्रभाग २२ मधून सूर्यकांत लवटे, सुनीता कोठुळे, नयना घोलप, जगदीश पवार, केशव पोरजे, विश्वनाथ रोकडे, प्रभाकर पाळदे, एस. पी. भालेराव, शंकर साडे, श्याम गोहाड, विक्रम कोठुळे, पोपट हगवणे या इच्छुकांनी नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर, जास्तीत जास्त सोशल मीडियाचाही वापर सुरू केला आहे. मात्र, सामान्य मतदार हे सोशल मीडियाला त्रस्त झाले आहेत याचे इच्छुकांनी भान ठेवावे, अशीही चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...