आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या वर्धापनदिनापासूनच वाजणार आगामी महापालिका निवडणुकीचा डंका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेची निवडणूक ताेंडावर अाली असतानाच १९ जून राेजी स्थापनेचे सुवर्णमहाेत्सवी वर्ष शिवसेना साजरे करणार अाहे. या निमित्ताने पक्षाची अाजवरची वाटचाल, विचार, कार्य, उपक्रम अाणि संदेश यांची माहिती लाेकांपर्यंत पाेहोचवून बालेकिल्ला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न हाेणार अाहे. या संदर्भात संपर्कप्रमुख अजय चाैधरी यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. १२) प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात लोकसभा मतदारसंघाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित हाेते. यावेळी अजय चाैधरी म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेना गेल्या ५० वर्षांपासून मराठी माणूस त्याची अस्मिता, हिंदुत्व, सीमाप्रश्न आंदोलन, शेतकऱ्यांचा विकास, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या प्रमुख मुद्यांवर वाटचाल करीत आहे. १९ जून राेजी शिवसेना राज्यभर सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करेल. हे अाैचित्य साधत महापालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागावे, असे अावाहनही त्यांनी केले.

सामाजिक कार्य घराघरांत पोहोचवून लोकांचा विश्वास संपादन करावा. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. शिवसेना सत्तेत असली तरी तिची बांधिलकी जनतेशी आहे. सत्तेत असतानादेखील नाशिकच्या जनतेसाठी शिवसेनेने मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला होता, असेही यावेळी सांगण्यात अाले. अनेक पक्षांकडे कार्यकर्ते नाहीत, फक्त नेत्यांच्या भरवशावर ही मंडळी महापालिकेवर डोळा ठेवून आहेत. परंतु, शिवसेना ही वाघांची फौज असलेली संघटना आहे, त्यामुळे ‘१०० प्लस’चे उद्दिष्ट गाठणे फारसे अवघड नाही. बहुमताने भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
जिल्हाप्रमुख करंजकर, आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, राजू अण्णा लवटे, नीलेश चव्हाण, विनायक पांडे, सत्यभामा गाडेकर, विलास शिंदे, सचिन मराठे, सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, डी. जी. सूर्यवंशी, यतिन वाघ, उत्तम दोंदे, जयंत दिंडे, शिवराम झोले, श्यामला दीक्षित, मंगला आढाव, योगेश बेलदार, दीपक दातीर, आदित्य बोरस्ते, संतोष कहार, गणेश बर्वे अादींसह जिल्ह्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी शिवसैनिक उपस्थित होते.

शहर हाेणार भगवेमय
यंदा साजऱ्या होणाऱ्या शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शहर भगवेमय करण्याची सूचना संपर्कप्रमुखांनी दिली. सर्व शाखांमध्ये पक्षाचे अधिकृत फलक लावून त्यात पक्षाची यशस्वी आंदोलने (सीमाप्रश्न आंदोलन, कामगार चळवळ, स्थानिक लोकाधिकार समिती) यांची माहिती, शिवसेनेच्या कारकीर्दीतील यशस्वी घटना, शिवजल क्रांती योजना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, शिवप्रकाश सौरऊर्जा योजना यांची माहिती उद््धृत करण्यात येणार अाहे. या निमित्ताने स्थानिक प्रश्नांनाही शिवसेना पुन्हा एकदा हात घालणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...