आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रभाग रचना, अारक्षणानुसारच अाता शिवसेना प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीची अारक्षण साेडत हाेताना प्रभागरचनेचे प्रारूपही जाहीर झाल्याने अाता राजकीय समीकरणे जुळविण्यास सुरुवात झाली अाहे. शिवसेनेकडे अनेकांचा अाेढा असला तरी पक्षाचे पदाधिकारी मात्र अाता अारक्षणे खुल्या जागा यांचे समीकरणे जुळविण्यात व्यस्त अाहेत. ज्या जागांसाठी शिवसेनेकडे प्रबळ उमेदवार नाहीत अशाच जागांसाठी अन्य पक्षातून अायात करण्याचा निर्णय पक्षीय पातळीवर घेण्यात अाला अाहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेने मनसेसह अन्य पक्षांतील नगरसेवकांनाही कवेत घेणे सुरू केले अाहे. मनसेचा बालेकिल्ला म्हणून नाशिकची अाेळख खाेडून काढण्यासाठी सेनेने यानिमित्त कंबर कसली अाहे. या पक्षातील माजी महापाैर अॅड. यतिन वाघ, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश धाेंगडे, सिडकाे प्रभाग समितीचे माजी सभापती अरविंद शेळके, नगरसेविका रत्नमाला राणे या मनसेच्या नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला अाहे. तसेच, राष्ट्रवादीचे माजी गटनेते विनायक खैरे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक गाेकुळ पिंगळे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अमाेल जाधव यांनीही सेनेत प्रवेश केला अाहे. अन्य पक्षांतील अाणखी काही दिग्गज शिवसेनेच्या ‘वेटिंग लिस्ट’मध्ये असून, ही सर्व मंडळी अारक्षण साेडतीची वाट पाहत हाेती. अारक्षण साेडतीनंतर निर्माण झालेले चित्र हे शिवसेनेसाठी फारसे निराशाजनक नसले तरीही पक्षात भारुडभरती करण्यापेक्षा विचारपूर्वकच प्रवेश देण्याची नीती अवलंबण्यात अाली अाहे. ज्या ठिकाणी सेनेकडे प्रबळ उमेदवार नाही अशाच ठिकाणी अन्य पक्षातील उमेदवारांना स्थान दिले जाईल, असे सांगितले जात अाहे.

शिवसेनेचे अाता ८० जागांचे लक्ष्य...
१२२ पैकी किमान ८० पेक्षा अधिक जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून यावेत, अशी रणनीती अाखण्यात अाली अाहे. विशेषत: ज्या प्रभागात भाजपचे वर्चस्व अाहे तेथे तुल्यबळ उमेदवार देण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...