आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्याध्यक्ष, कार्यवाह, अर्थसचिव पदांसाठी नव्या प्रभारींची नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळात सुरू असलेली अंतर्गत धुसफूस मंडळाच्या रविवारच्या (दि. २३) बैठकीत शमण्याची अपेक्षा फाेल ठरली. अध्यक्ष विलास अाैरंगाबादकर यांनी कार्याध्यक्ष, कार्यवाह अर्थसचिव यांच्या जागेवर नव्या प्रभारींची नेमणूक केल्याची माहिती दिली. तसेच, हे तिघेही त्यांच्यावर ठेवलेल्या अाराेपांबद्दल साेमवारी (दि. २४) उत्तरे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या एकूणच पार्श्वभूमीवर कारवाई झालेल्या तिघांसह अध्यक्षही एक पाऊल मागे अाल्याचे चित्र अाहे.
कार्याध्यक्ष विनया केळकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांच्यावर विविध अाराेप ठेवत अध्यक्ष अाैरंगाबादकर यांनी घटनेतील ‘२२/५’चा अाधार घेत या तिघांनाही अापले काम थांबवण्याचा अादेश दिला हाेता. तसेच, या अादेशाबराेबर जहागिरदार यांच्याकडे ३७, केळकर यांच्याकडे २६, तर बेदरकर यांच्याकडे १३ मुद्द्यांचा खुलासा सात दिवसांच्या अात मागितला हाेता. या तिघांनीही ताे या कालावधीत दिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात अाली हाेती. मात्र, अध्यक्षांनी केलेली ही कारवाईच बेकायदेशीर असल्याचा अाराेप या त्रयींनी पत्रकार परिषदेत केला हाेता.

या एकूणच परिस्थितीवर रविवारच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत प्रकाश पडण्याची शक्यता असताना घडले मात्र वेगळेच. उलट, अध्यक्षांनी प्रभारी कार्याध्यक्षपदी अॅड. अभिजित बगदे, प्रभारी कार्यवाहपदी अानंद देशपांडे अर्थसचिवपदी गिरीश नातू यांची निवड केल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे, तर अध्यक्षांनी कार्यकारी मंडळातून काढून टाकलेले रमेश जुन्नरे अाणि प्रा. वेदश्री थिगळे यांनाही पुन्हा कार्यकारिणीवर घेतले. वासुदेव दशपुत्रेही अाता अापला उपाध्यक्षपदाचा कार्यभार पुन्हा बघणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

रविवारी दिवसभर सावानात खलबते सुरू हाेती. सकाळपासूनच दाेन्ही गटांच्या बैठका सुरू हाेत्या. एका वेळी तर सगळे एका बैठकीत अाल्यानंतर चांगलीच हमरीतुमरी झाली. त्यावेळी देवघेव विभागात अालेले वाचकही ‘वर काय सुरू अाहे’, अशी विचारणा करत हाेते. माेठमाेठ्याने बाेलण्याच्या, टेबल-खुर्ची अापटण्याच्या अावाजामुळे अनेकांनी वाचनालयाच्या वास्तूत सुरू असलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

उत्तरे पटली तर त्यांना परत घेऊ...
^रविवारच्या बैठकीत अाम्ही समन्वयाचीच भूमिका घेतली. अजूनही मी त्याच भूमिकेत अाहे. जहागिरदार, केळकर, बेदरकर यांनी त्यांना दिलेल्या अादेशपत्रातील मुद्द्यांचा खुलासा करावा, असे सांगितले हाेते. ते साेमवारपासून ताे करणार अाहेत. पण, ताेपर्यंत पदे रिक्त ठेवता येत नसल्याने प्रभारी पदे भरली अाहेत. त्यांना त्यांची कामे तात्पुरती थांबविण्याचे अादेश दिले अाहेत. त्यांचे म्हणणेे अाम्ही एेकून घेणार अाहाेत. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली तर त्यांना सन्मानाने परत घेतले जाईल. या सर्व घडामाेडींबाबत शांततेच्या मार्गानेच ताेडगा काढण्याचा अामचा प्रयत्न अाहे. -विलास अाैरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना

साेमवारच्या बैठकीनंतरच प्रतिक्रिया
रविवारच्याबैठकीत कार्यकारी मंडळाकडून काहीच ताेडगा निघाला नाही. अाता साेमवारी पुन्हा बैठक अाहे. त्या बैठकीत काय हाेते हे पाहूनच मी प्रतिक्रिया देईन, असे मिलिंद जहागिरदार यांनी सांगितले.

‘सावाना’त सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी कार्यवाहपदाचे काम थांबविण्याचे अादेश दिल्यानंतरही रविवारी मिलिंद जहागिरदार यांनी कार्यालयीन जागेत अासनस्थ हाेऊन कार्यकारी मंडळ अध्यक्ष काय निर्णय घेतात, याची प्रतीक्षा केली. यावेळी त्यांच्यासाेबत कार्याध्यक्ष अर्थसचिवपदाचे काम थांबविण्याचे अादेश दिलेले विनया केळकर स्वानंद बेदरकर हे पदाधिकारीही उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...