आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुकीसाठी अाज मतदान, 31 प्रभागांतील 122 जागांचे भवितव्य हाेणार बंदिस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी निर्णायक टप्प्यावर अाली असून, ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी  मंगळवारी (दि. २१) मतदान हाेणार अाहे. सकाळी ७.३० वाजेपासून तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान चालणार असून त्यानंतर उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त हाेणार अाहे.
 
महापालिका निवडणुकीसाठी खऱ्या अर्थाने २७ जानेवारीपासून रणधुमाळी सुरू झाली. ३ फेब्रुवारी राेजी नामनिर्देशनपत्र भरण्याची मुदत संपली. त्यानंतर ७ फेब्रुवारीपर्यंत माघारीची मुदत हाेती. त्यानंतर ३१ प्रभागातील १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार रिंगणात उरले. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे जणू मिनी विधानसभेची निवडणूक हाेत असल्याचे चित्र हाेते. चार भागातील चार सदस्य घेऊन राजकीय पक्षांनी पॅनल करून समताेल साधण्याची धडपड केली. या पद्धतीमुळे यंदा निवडणूक चुरशीची हाेईल असे वाटत हाेते. प्रत्यक्षात माेठा मतदारसंघ पिंजून काढण्यातच उमेदवार अडकले. त्यामुळे प्रचाराचा ज्वर यंदा तापू शकला नाही. 

त्याची प्रचिती राजकीय दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभेही अाली. शिवसेना व भाजप सत्तेत असूनही गर्दीचा महासागर गाेल्फ क्लब येथे उलटू शकला नाही. गर्दी खेचण्याची क्षमता असलेले मनसेबाबतही काही प्रमाणात निराशाच झाली. दरम्यान  मतदानाच्या ४८ तास अाधी जाहीर प्रचारास बंदी असल्यामुळे रविवारी सायंकाळी प्रचाराच्या ताेफा थंडावल्या. साेमवारी दिवसभर वैयक्तिक गाठीभेटी, गुप्त बैठका, लक्ष्मीदर्शनासारखे नानाविध प्रयाेग करून उमेदवार अाप अापली जागा पक्की करण्याचा प्रयत्न करत हाेता. दरम्यान, मंगळवारी सकाळी ७.३० वाजेपासून तर सायंकाळपर्यंत मतदान हाेणार अाहे. 

२० जागांवर उमेदवाराची भाऊगर्दी
महापालिकेच्या १२२ पैकी २० जागावर १० पेक्षा अधिक उमेदवार अाहेत. त्यामुळे मतविभाजनाचा फायदा काेणाला मिळेल व फटका काेणाला बसेल याविषयी उत्सुकता वाढली अाहे. ३ पेक्षा कमी उमेदवार असलेल्या १० जागा असून येथे सरळ लढती अाहेत.

पक्षनिहाय उमेदवार
भाजप     ११९
शिवसेना     ११२
मनसे     ९७
राष्ट्रवादी     ५४
काँग्रेस     ४१
बसपा     ३२
माकप     १४
भारिप     १४
धर्मराज्य पक्ष     ११
एमअायएम     ९
बहुजन विकास अाघाडी ६
राष्ट्रीय समाज पक्ष    ५
रिंपाइं (एे)     ८
रिंपाइं सेक्युलर     ६
भारतीय संग्राम परिषद    ६
बहुजन रिपब्लिकन साेशालिस्ट पार्टी ३ 
समाजवादी पार्टी    ३
भाकप    २
संभाजी बिग्रेड    २
अांबेडकरराईट पार्टी अाॅफ इंडिया २
भा.जनहित काँग्रेस     १
जनसुराज्य शक्ती    १
 
बातम्या आणखी आहेत...