आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अापत्कालीन संकटामुळे रद्द पालिका अधिकाऱ्यांची सुटी, अग्निशामक दलाला ६० काॅल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी चाललेले बचावकार्य येत्या काही दिवसांत जाेरदार पावसामुळे संभावित असणारे धाेके लक्षात घेत अायुक्त अभिषेक कृष्ण यांनी पालिका खातेप्रमुखांच्या सुट्या रद्द करण्याचे अादेश दिले अाहेत. अापत्कालीन नियाेजन कक्ष २४ तास सुरू ठेवण्यासह प्रत्येक अधिकाऱ्याला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अायुक्तांच्या उपस्थितीत अापत्कालीन नियाेजन दक्षता यासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर त्यांनी सकाळी ११.३० वाजता राजीव गांधी भवन येथून पाहणी दाैरा सुरू केला. सर्वप्रथम चाेपडा लाॅन्स, इंद्रप्रस्थ पुलाखाली पाहणी केली. त्यानंतर मल्हारखाण, हनुमान घाट, रामवाडी पूल, हाेळकर पूल ते तेली गल्ली, रामकुंड, म्हसाेबा पटांगण, गाडगे महाराज पूल, माेदकेश्वर पटांगण, टाळकुटेश्वर मंदिर, काझी गढी, अमरधामराेड,गणेशवाडी शाळा अादी भागातील परिस्थितीची पाहणी केली. गाेदावरीची पूरस्थिती किनाऱ्यावरील रहिवाशांना पाेहोचणारे धाेके याबाबत माहिती घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. अापत्कालीन परिस्थिती अचानक उद‌्भवणार असल्यामुळे येत्या काही दिवसांत अधिकाऱ्यांनी रजा घेऊ नये सतर्क राहावे, अशा सूचना केल्या. अापत्कालीन नियाेजन कक्ष २४ तास सुरू ठेवावा त्यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करून देण्याचे अादेश प्रशासन उपायुक्तांना दिले.
असेराबवले रेस्क्यू अाॅपरेशन :
महापालिकेनेगत तीन दिवसांत गाेदावरीसह लगतच्या वाघाडी, नासर्डीतील नाल्यांना अालेल्या पुरात अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी माेठी कसरत केली. नियंत्रण कक्ष चाेवीस तास सुरू हाेता. अापत्कालीन कक्षाकडे जवळपास ६० तक्रारी मदतीसाठी अाल्यानंतर त्यातील १५ तक्रारी झाडे पडल्याबाबत हाेत्या. ही झाडे अग्निशामक दलाने रस्त्याच्या कडेला हलवली. मनुष्य वाहने पाण्यात अडकल्याच्या दहा तक्रारी अाल्या. त्यात गांधी ज्याेतीवर अडकलेल्या निवृत्ती बिन्नर विठ्ठल कारवतकर यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात अाले. पाच ठिकाणी घरे काेसळली. त्यात माेदकेश्वर मंदिराजवळ घराची भिंत काेसळल्यानंतर अडकलेल्या दोघा जखमींना बाहेर काढण्यात अाले. काळाराम मंदिराजवळ काेसळलेल्या घराजवळ बचावकार्य राबवले. श्रद्धा लाॅन्स, अमरधाम झाेपडपट्टीतील जवळपास १० जणांना सुखरूप बाहेर काढले. तब्बल २८ घरांत पाणी शिरल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर येथेही मदतकार्य करण्यात अाले.
६० महापालिकेच्याअग्निशामक दलाला मदतीसाठी नागरिकांचे काॅल्स अाले.

२८ घरांतपाणी शिरण्याचे काॅल्स
१५ घराजवळवा रस्त्यांवर झाड पडणे
१० पाण्यातबुडणे
०५ घरपडणे
०२ शाॅर्टसर्किटचेकाॅल्स

पाच ठिकाणी पूरग्रस्तांची निवासव्यवस्था
पुरामुळे हाेणाऱ्या विस्थापितांच्या निवाऱ्याची महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली अाहे. खासकरून ठिकाणी प्रमुख व्यवस्था असून, मखमलाबाद नाक्याजवळील हिरे विद्यालयात मनपा क्रमांक २९ मध्ये खाेल्या, गणेशवाडी मनपा शाळा क्रमांक ३० मध्ये ४, पंचवटी विभागीय कार्यालय जुनी इमारतीत ५, तर गणेशवाडी भाजी मार्केट संजयनगर समाजमंदिरात राहण्याची व्यवस्था केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...