आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक ताेंडावर; नगरसेवकांना ६० लाखांच्या निधीचे गाजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्वरित सहा महिने तरी नगरसेवकांना निधीची चणचण नकाे म्हणून स्थायी समितीने २०१६-२०१७ या वर्षातील अंदाजपत्रकात ६० लाख रुपयांच्या नगरसेवक निधीची तरतूद करून सर्वांनाच सुखद धक्का दिला अाहे. दरम्यान, अार्थिक खडखडाटामुळे जुन्याच याेजनाचा रतीब अंदाजपत्रकात दिसत अाहे.
निवडणुकीसाठी जेमतेम काही महिने बाकी असताना तब्बल तीन महिने विलंबानंतर स्थायी समितीचे अंदाजपत्रक महासभेच्या मंजुरीसाठी पाठवले जात अाहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात अायुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात १,३५७ काेटी रुपयांची तरतूद हाेती. स्थायी समितीचे तत्कालीन सभापती शिवाजी चुंभळे यांनी त्यात ३८० काेटी रुपयांची वाढ करून अंदाजपत्रक अाता १,७३७ काेटी रुपयांपर्यंत पाेहोचवले अाहे. या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य म्हणजे नगरसेवक, महापाैर पदाधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न अाहे. नगरसेवकांना तब्बल ६० काेटी रुपयांचा निधी महत्त्वाची कामे करण्यासाठी दिला अाहे. महापाैरांना तीन काेटी, उपमहापाैर स्थायी समिती सभापतींना दोन काेटी, सभागृहनेता एक काेटी, महिला बालकल्याण सभापतींना काेटी निधी दिला जाईल.

मनसे राष्ट्रवादीची पालिकेत सत्ता असून, अाता मनसेचे विद्यमान सभापती सलीम शेख हे अंदाजपत्रक सादर करणार असले, तरी प्रत्यक्षात हे अंदाजपत्रक सभापती चुंभळे यांच्याच कार्यकाळातील मानले जाते. अार्थिक खडखडाटामुळे अंदाजपत्रकात नवीन काहीच नसल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. घरपट्टी, पाणीपट्टीसारखी करवाढ फेटाळण्याबराेबरच कवी कुसुमाग्रज उद्यान नूतनीकरण करणे, गाेदापार्क, पांडवलेणीजवळील बाॅटनिकल गार्डन, मुकणे याेजनेचा अंतर्भाव अाहे. सातपूरला चुंचाळे शिवारात १०० खाटांचे रुग्णालय बांधणे, तसेच नाशिक पूर्व सिडकाेतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण अस्तरीकरणाचा ठळक बाबींमध्ये समावेश अाहे.
बातम्या आणखी आहेत...