आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या अाराेग्य विभागाचे प्रयत्न अपुरे , ‘हागणदारीमुक्त नाशिक’चे स्वप्न डिसेंबरपर्यंत लांबणीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे स्वच्छ भारत अभियानातील शहर हागणदारीमुक्त करण्याचे स्वप्न अाता दाेन महिने लांबणीवर पडल्याचे चित्र असून, अाता डिसेंबरपर्यंत शहर हागणदारीमुक्त करण्याचा दावा महापालिकेच्या अाराेग्य विभागाने केला अाहे. यापूर्वी शहर अाॅक्टाेबरपर्यंत हागणदारीमुक्त हाेईल, असा अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांचा दावा हाेता. मात्र, लाभार्थ्यांचा प्रतिसाद पुरेसे प्रबाेधन नसल्यामुळे याेजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमागील शुक्लकाष्ठ अद्यापही थांबता थांबलेले नाही.
माेदी सरकार अाल्यानंतर त्यांनी स्वच्छता अभियानावर जाेरदार भर दिला. विशेष म्हणजे, या अभियानासाठी काेट्यवधी रुपयेही उपलब्ध करून दिले. महापालिकेच्या अाराेग्य विभागाने सर्वेक्षण करून उघड्यावर शाैचास बसणाऱ्या कुटुंबांचा शाेध घेतला. त्यानुसार ७५२८ लाभार्थ्यांकडे शाैचालय नसल्याचे अाढळले हाेते. यापैकी ज्या लाभार्थ्यांकडे जागा अाहे त्यांना अर्थसहाय्य, तर ज्यांच्याकडे जागाच नाही त्यांना पाच कुटुंबामागे एक याप्रमाणे गट शाैचालय याेजनाही राबवण्यात अाली. दरम्यान, अाता ही याेजना पूर्ण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य सचिवांच्या उपस्थितीत व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगद्वारे अाढावा घेण्यात अाला. साधारणत: ७२६४ लाभार्थ्यांना शाैचालय देण्यासाठी प्रयत्न असून, त्यापैकी अाॅगस्टअखेरीस ५२६१ शाैचालयांचे बांधकाम पूर्ण झाले अाहे. अद्याप २८५८ शाैचालयांची बांधकामे अपूर्ण असून, ही कामे डिसेंबरपर्यंत काेणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.

दरम्यान, यापूर्वी राज्य शासनाला पाठवलेल्या अहवालात अाॅक्टोबरमध्ये नाशिक हागणदारीमुक्त हाेणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला हाेता.त्यावेळी अाराेग्याधिकाऱ्यांनी शुद्ध लाेणकढी थाप मारीत, भाजपच्या दाेन अामदारांच्या मतदारसंघाचा समावेश असलेले सात प्रभाग हागणदारीमुक्त झाल्याचा दावाही केला हाेता. याव्यतिरिक्त ५४ प्रभाग अाॅक्टोबरपर्यंत हागणदारीमुक्त हाेतील, असेही चित्र निर्माण केले हाेते.
हजार लाभार्थ्यांची नकारघंटा
वैयक्तिक शाैचालय याेजना ही डिसेंबरपर्यंत पूर्ण करायची असून, या याेजनेंतर्गत ३०२ लाेकांनी अनुदानाची रक्कम परत केली अाहे. त्यानुसार ६३८ लाभार्थी बांधकाम सुरू करण्यास अनुत्सुक असल्याने त्यांचे प्रबाेधन करून याेजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.

अशी झाली बांधकामे
सातपूर: १०९२
सिडकाे : ४४२
पूर्व : ४२५
नाशिक पश्चिम : ९४
नाशिकराेड : ८५१
पंचवटी : १५०२

अाता ३७७४ बांधकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट...
सप्टेंबरमध्ये ८५३, अाॅक्टोबर ८५३, नाेव्हेंबर८२७, तर डिसेंबरमध्ये ३८६ बांधकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, जवळपास ३७७४ बांधकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्यामुळे अाराेग्य विभागाची धावपळ उडणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...