आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांत डेंग्यूचे 37 संशयित रुग्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कधीपाऊस तर कधी आक्‍टोंबर हीटचा तडाखा अशा विचित्र वातावरणामुळे शहरात रोगराईने डोके वर काढले असून, आठवडाभरात शहरात डेंग्यूचे 37 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 40 संशयित रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. यावरून शहरातील आरोग्‍य व्यवस्थेनेही मान टाकल्याचे स्पष्ट होत आहे.
आक्‍टोंबरमध्ये तपमानात विचित्र बदल झाले आहेत. दिवसा ढगाळ तसेच दमट वातावरण असून, दुपारनंतर वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडतो. सायंकाळी कधी दमट, तर कधी थंड हवामान असल्याने वातावरणाशी जुळवून घेताना नाशिककरांच्या नाकीनऊ येत आहे. दरम्यान, विचित्र तपमानामुळे सर्दी, खोकल्यात वाढ झाली असून, तापाचे रुण वाढत आहेत. त्यामुळे डेंग्यू स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. याचबरोबरच शहरातील अस्वच्छताही हे आजार फैलावण्यास कारणीभूत ठरत आहे. यातूनच डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे स्वच्छतेला पालिकेने प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी
शहरातसध्या हवामान विचित्र स्वरूपाचे झाले असून, यामुळे तापाचा आजार बळावला आहे. कधी पाऊस तर कधी तप्त ऊन यामुळे अरोग्‍यावर विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांनी यासाठी काळजी घ्यावी. डॉ.आर. बी. गायकवाड, वैद्यकीयअधीक्षक, महापालिका