आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Municipal In Water Manegment For Special Session

पाणी नियाेजनासाठी साेमवारी महापालिकेची विशेष सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मराठवाड्याला पाणी साेडल्यामुळे गंगापूर धरणातून महापालिकेच्या वाट्याला कागदाेपत्री जरी २७०० दशलक्ष घनफूट पाणी दिसत असले तरी गळती, बाष्पीभवन अन्य कारणांमुळे प्रत्यक्षात दोन हजार दशलक्ष घनफूट पाणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी जुलैपर्यंत अाहे ताे पाणीसाठा पुरवून वापरण्याकरिता महापालिकेची विशेष सभा साेमवारी हाेणार असून, त्यात तीन दिवसांअाड एकदा पाणी बंदबाबत निर्णय हाेण्याची चिन्हे अाहेत.
पावसाने अाेेढ दिल्यानंतर मराठवाड्याने न्यायालयीन लढाई लढवून गंगापूर धरणातील पाण्यावर दावा केला. नाशिकमधील सर्वपक्षीयांच्या विराेधानंतरही मराठवाड्याला गंगापूर धरणातून एक हजार दशलक्ष घनफूट पाणी साेडण्यात अाले. दरम्यान, पाणी साेडण्यापूर्वी नाशिक शहरातील पाण्याबाबत काेणताही विचार झाला नाही. किंबहुना महापालिकेने उच्च न्यायालयातील सुनावणीत सहभागी हाेऊन शहराच्या दृष्टीने पाण्याची गरज दाखवून देण्याची तसदी घेतली नाही.

या पार्श्वभूमीवर जुलैपर्यंत काळजीपूर्वक पाणी वापर करण्यासाठी विशेष सभा घेण्याची मागणी शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी केली हाेती. त्यानुसार, साेमवारी विशेष महासभा घेण्याचे अादेश महापाैर अशाेक मुर्तडक यांनी िदले अाहेत. दरम्यान, मराठवाड्याला पाणी सोडण्याप्रश्नी लोकप्रतिनिधींनीही ठोस भूमिका घेणे गरजेचे होते. त्यामुळे अशी स्थिती उद््भवलीच नसती, असा सूर नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.

२००० दशलक्ष घनफूट पाणी मिळण्याची चिन्हे
गंगापूर धरणातून एक हजार दशलक्ष घनफूट पाणी साेडल्यानंतर नुकतेच मंत्रालयात पाणी अारक्षणाचे नियाेजन झाले. त्यात नाशिक मनपाच्या वाट्याला गंगापूर धरण समूहातून २७०० दशलक्ष घनफूट पाणी पदरात पडले. वस्तुत: महापालिकेची पाण्याची वार्षिक मागणी ४६०० दशलक्ष घनफूट हाेती. म्हणजेच जवळपास ४५ टक्के मागणीत कपात केल्यानंतर अाता २७०० दशलक्ष घनफूट पाणीही जे मंजूर अाहे त्यातील जेमतेम २००० दशलक्ष घनफूट पाणीच प्रत्यक्ष हातात येईल, अशी शक्यता ज्येष्ठ नगरसेवक व्यक्त करीत अाहेत.