आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेतील मनुष्यबळ अाणखी कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडे महापालिकेला ‘ब’ दर्जा असल्याने अार्थिक स्थिती कामाचा व्याप माेठा असला तरी, संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी दिवसागणिक हात वाढण्याएेवजी मनुष्यबळ कमी होत चालले अाहे. दिवाळीच्या ताेंडावर उपायुक्तांसह १६ कर्मचारी सेवानिवृत्त हाेणार असल्याने पालिकेची चिंता वाढली अाहे. दुसरीकडे, नवीन अाकृतिबंधानुसार हजार नवीन कर्मचाऱ्यांची गरज असून अाता शासन त्याबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले अाहे.
शहराच्या दृष्टीने पालिकेसारखी स्थानिक स्वराज्य संस्था पालकाच्या भूमिकेत अाहे. एकीकडे, लाेकसंख्येचा वेग वाढत असून, सद्यस्थितीत विविध कंत्राटांसाठी दिल्या जाणाऱ्या अाकडेवारीचा विचार केला तर १६ लाख लाेकसंख्या गृहित धरली जात अाहे. या लाेकसंख्येच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पालिकेकडे जेमतेम हजारांच्या अासपास मनुष्यबळ मंजूर अाहे. प्रत्यक्षात, त्यापेक्षा कितीतरी कमी कर्मचारी अाहेत.

महापालिकेचा अास्थापना खर्च कमी हाेत नसल्यामुळे पालिकेला थेट भरती करण्यावर निर्बंध अाहे. शासन नियमानुसार महापालिकेचा अास्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा कमी हाेणे गरजेचे अाहे. प्रत्यक्षात पालिकेची उत्पन्नासाठी मारामार, जकात जाऊन एलबीटी त्यानंतर अाता जीएसटीचे संकट यामुळे अार्थिक स्थिती खालावत अाहे. दुसरीकडे, बांधकाम क्षेत्राच्या अनुषंगाने परवानगी बंद असल्यामुळे दाेनशे ते अडीचशे काेटी अपेक्षित उत्पन्नाला मुकावे लागत अाहे. घरपट्टी पाणीपट्टीसाठी कमी कर्मचारी असल्यामुळे अपेक्षित पावणेदाेनशे काेटी उत्पन्नासाठी झगडावे लागत अाहे. या सर्वांचा परिणाम म्हणून अास्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा कमी झालेला नाही. या सर्व परिस्थितीत नवीन नाेकरभरतीला परवानगी नाही दुसरीकडे सेवानिवृत्तीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची कमी हाेणारी संख्या असा दुहेरी काेंडमारा सुरूच अाहे.

दरम्यान, अाॅक्टाेबरअखेर महापालिकेतील १६ कर्मचारी सेवानिवृत्त हाेणार अाहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या थांबता थांबत नसून निवृत्ती सेवेत अपरिहार्य अाहे; मात्र त्यांची जागा घेण्यासाठी नवीन कर्मचारी नसल्यामुळे महापालिकेचा डाेलारा काेलमडण्याची भीती व्यक्त हाेत अाहे.

हे कर्मचारी हाेणार निवृत्त
दत्तात्रय गाेतिसे (उपायुक्त), उमेश जाेशी, रमेश शेवाळे, अशाेक बाेढारे, रावसाहेब गायकवाड, रमेश जेजूरकर, नारायण पंचभैये, लीलाबाई शेलार, मंगला अाहेर, रजियाबी सय्यद, सुरेश जाधव, विमल शिंदे, बबाभाई भाेंग, कमल खिमसुरिया, बाळू जगझाप आणि गाैरी वाल्मीक.

अाठ हजार कर्मचाऱ्यांची गरज
महापालिकेकडे सात हजार कर्मचारी असून, नवीन अाकृतिबंधानुसार हजार नवीन पदांची निर्मिती अपेक्षित अाहे. ही निर्मिती झाल्यास पालिकेचे कामकाज काहीसे सुरळीत हाेईल करदात्यांना तक्रारी कमी हाेऊन पैसे देऊन सुविधा मिळत असल्याचे समाधान मिळणार अाहे. दरम्यान, सातव्या वेतन अायाेगाचा बाेजा, उत्पन्नाची मारामार लक्षात घेत नवीन पदांना शासनाने हिरवा कंदील दिला तरी प्रत्यक्षात भरती हाेईल की नाही, याबाबत शंकाच अाहे.
बातम्या आणखी आहेत...