आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छ जलकुंभ, गढूळ पाणी यामुळे भडकले नगरसेवक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महिनाभरापासून सुरू असलेला गढूळ पाणीपुरवठा चाळीस वर्षे उलटूनही जलकुंभांच्या संपूर्ण स्वच्छतेला वेळ मिळत नसल्याची खुशाल प्रतिक्रिया देणाऱ्या प्रशासनाच्या बेफिकिरीवरून महासभेत नगरसेवक चांगलेच भडकले. धरणात भरपूर पाणी असतानाही शहरात कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा हाेत असल्याची नगरसेवकांनी तक्रार केल्यानंतर महापाैर अशाेक मुर्तडक यांनी गंभीर दखल घेत तत्काळ शुद्ध पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा, टाक्याही स्वच्छ कराव्यात, असे अादेश प्रशासनाला दिले.
महासभेत निलगिरी बाग पाण्याची टाकी तीन वर्षांकरिता अाउटसाेर्सिंगद्वारे देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा प्रस्ताव हाेता. त्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला फैलावर घेतले. राहुल दिवे यांनी सांगितले की, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी स्वच्छता करणाऱ्या दाेन युनिटपैकी एक भिंत पडून बंद पडले अाहे. सध्या २६ एमएलडी क्षमतेच्या युनिटवर ३२ एमएलडी पाणी स्वच्छ करण्याचा भार असल्याने गढूळ पाणी कसे येणार नाही, असा सवालही केला.
नीलिमा अामले यांनी विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे सांगितले. दिनकर पाटील यांनी गढूळ पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचीही खंत व्यक्त केली. त्यावर अधीक्षक अभियंता पवार यांनी धरणातील पाणीच गढूळ असल्याने शुद्धीकरणानंतरही अडचण येत असल्याचे सांगत अॅलम पावडरचा डाेस वाढवणार असल्याचे स्पष्ट केले.

८४ जलकुंभांच्या स्वच्छतेसाठी वेळापत्रक
‘दिव्यमराठी’ने अस्वच्छ जलकुंभांकडे लक्ष वेधल्यानंतर अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांनी ४० वर्षांपासून जलकुंभ स्वच्छ झाले नसल्याची प्रतिक्रिया दिली हाेती. त्याकडे लक्ष वेधत दिनकर पाटील यांनी अशी बेफिकिरी असेल तर कसे स्वच्छ पाणी मिळेल, असा सवाल केला. स्थायी समितीने जलकुंभ स्वच्छ करण्याचे अादेश दिल्यावरही कारवाई हाेत नसल्याने पाणीपुरवठा विभाग असंवेदनशील असल्याचा अाराेप केला. पवार यांनी पावसाळ्यानंतर ८४ जलकुंभांची स्चच्छता करणार असल्याचे तसे वेळापत्रक केल्याचे स्पष्ट केेले.
बातम्या आणखी आहेत...