आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन काेटींची मालमत्ता जप्तीची महापालिकेने बजावली नाेटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक; ताेंडावरअालेला मार्च एण्ड लक्षात घेत महापालिकेने घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले अाहे. गेल्या वर्षी मार्चपर्यंत एक लाखाच्या पुढे थकबाकी असलेल्या १५२ मिळकतधारकांची मालमत्ता जप्त करण्यासाठी नाेटीस पाठवण्यात अाली अाहे. जवळपास काेटी ३१ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत अाहे.

घरपट्टी वसुलीचे यंदा १२५ काेटींचे उद्दिष्ट असून, मागील थकबाकी वसुलीचे अाव्हानही पालिकेपुढे अाहे. एप्रिल ते मे या महिन्यात सवलत याेजना जाहीर केल्यामुळे झटपट ३५ काेटींपर्यंत वसुली झाली. मात्र, त्यानंतर वसुली संथ झाल्याचे चित्र अाहे. दरम्यान, गेल्या वर्षी मार्च २०१५ पर्यंत थकबाकी असलेल्या बड्या थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली अाहे. त्यासाठी थकबाकी भरल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात नाेटिसा पाठवण्यात अाल्याची माहिती अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांनी दिली.
पाच हजारांवर थकबाकी असलेल्यांना सूचनापत्र पाठवले अाहे. २५ लाख ते एक लाखापर्यंत थकबाकी असलेल्या ५२७, १० ते २५ लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या १००५ मिळकतधारकांना नाेटिसा दिल्या अाहेत. १० लाखांपर्यंत थकबाकी असलेल्यांकडून पावणेअाठ काेटींपर्यंतची थकबाकी येणे अपेक्षित अाहे.
बातम्या आणखी आहेत...